Nashik Abduction News : मालेगाव येथील साबण कारखानदाराच्या अपहरणाचा प्रयत्न फसला

Nashik News : शहरातील जुन्या मुंबई-आग्रा महामार्गावरील जाफरनगर मोरीजवळून साबण कारखानदाराचे गावठी कट्ट्याचा धाक दाखवून अपहरण करण्यात आले.
Abduction
Abductionesakal

मालेगाव : शहरातील जुन्या मुंबई-आग्रा महामार्गावरील जाफरनगर मोरीजवळून साबण कारखानदाराचे गावठी कट्ट्याचा धाक दाखवून अपहरण करण्यात आले. अपहरण करुन त्याच्याजवळून सुमारे पाच लाख रुपये खंडणी उकळण्याचा चौघा सराईत गुन्हेगारांचा प्रयत्न हॉटेलवरील गर्दीमुळे अपयशी ठरला. २० मेस रात्री हा प्रकार घडला. (attempt to abduct soap factory owner from Malegaon failed)

मुंबई-आग्रा महामार्गावरील चाचा सोप सेंटर या साबण विक्री सेंटर व कारखान्याचे मालक शहबाज मोहम्मद हुसेन चौधरी यांना त्यांच्या जाफरनगर मोरीजवळील घरासमोरुन जलालुद्दीन कमालुद्दीन उर्फ आरिफ कुरेशी, शहबाज उर्फ कमान्डो, साद अन्सारी व पापा टकल्या या चार सराईत गुन्हेगारांनी संगनमत करुन बोलावले.

आम्हाला पैशांची गरज आहे. तू पाच लाख रुपये दे असे सांगितले. शहबाज चौधरी यांनी माझ्या जवळ पैसे नाही असे सांगताच चौघा संशयितांनी लाथा बुक्क्यांनी नाकावर, पोटावर व छातीवर मारहार करत पैसे दिले नाही तर मारुन टाकू असा दम दिला. कमान्डोने त्याच्या जवळील गावठी कट्ट्याचा धाक दाखवून जबरदस्तीने दुचाकीवर बसवून अन्सार पत्रा डेपोसमोरील हॉटेलमध्ये नेले.

तेथेही ते पैशांची मागणी करु लागले. हॉटेलवर गर्दी होत असल्याचे पाहून शहबाज चौधरीला तेथेच सोडून चौघे सराईत गुन्हेगारांनी पलायन केले. घटनेची माहिती समजताच सहाय्यक पोलिस अधिक्षक तेगबिरसिंह संधू, पोलिस निरीक्षक सूर्यवंशी, उपनिरीक्षक चव्हाण व सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. (latest marathi news)

Abduction
Dhule Crime News : धुळ्यात 137 जणांवर गुन्हा; संशयितांचे धरपकडसत्र सुरू

शहबाज चौधरीच्या तक्रारीवरुन चौघा जणांविरुध्द अपहरण, मारहाण व शस्त्रास्त्र विरोधी कायद्यान्वये पवारवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस चौघा संशयितांचा शोध घेत असून, उपनिरीक्षक चव्हाण तपास करीत आहेत.

गावठी पिस्तुले येतात कुठून?

अपहरणाचा हा प्रकार सुदैवाने अपयशी ठरला असला तरी या गुन्ह्यात पुन्हा एकदा गावठी पिस्तुलाचा वापर झाला आहे. यापूर्वी गेल्या महिनाभरात झालेल्या चार वेगवेळ्या गुन्ह्यात गावठी पिस्तुल वापरण्यात आले. मच्छि बाजार भागात झालेल्या गोळीबारात एका तरुणाचा हकनाक बळी गेला. संगमेश्‍वर भागात देखील गोळीबाराचा प्रकार घडला.

काही महिन्यापुर्वी शहरातील अवैध धंद्याच्या वर्चस्वावरुन इब्राहीम गांजावाल्याचा गोळी घालून खून करण्यात आला होता. शहरातील गुन्हेगार व समाजकंटकांकडेही शस्त्र हुडकून काढण्याची गरज वेळोवेळी अधोरेखित होत आहे. गुन्हेगार सर्रासपणे गावठी पिस्तुलांचा वापर करीत असून, त्याची पाळेमुळे खणून काढली पाहिजेत.

Abduction
Crime News: मालाडमध्ये वृद्ध महिलेची हत्या; आरोपीची पोलिस कोठडीत रवानगी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com