Nashik Police : दत्तक गुन्हेगारांच्या अंमलदारांना दणका! पोलीस उपायुक्तांची कारवाई; अंबडच्या चौघांवर कारवाई

Crime News : पोलीस आयुक्तालय हद्दीतील रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांच्या हालचाली टिपण्यासाठी ‘दत्तक गुन्हेगार योजना’ राबविण्यात आली आहे
Nashik Police
Nashik Policeesakal

Nashik Police : शहरातील रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी त्या-त्या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अंमलदारांना दत्तक गुन्हेगार योजनेंतर्गत नेमून दिले होते. परंतु असे असतानाही गेल्या महिन्यात सिडकोत दोन गुन्हेगारी टोळीत भडका उडाल्याने दत्तक गुन्हेगारावर नजर ठेवण्यासाठी नेमलेल्या अंमलदारांना पोलीस उपायुक्तांनी दणका देत त्यांच्यावर आर्थिक दंडाची कारवाई केल्याचे समजते. (Nashik crime bang to enforce of adopted criminals)

पोलीस आयुक्तालय हद्दीतील रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांच्या हालचाली टिपण्यासाठी ‘दत्तक गुन्हेगार योजना’ राबविण्यात आली आहे. त्यानुसार दत्तक गुन्हेगारासाठी नेमलेल्या पोलीस ठाण्यातील अंमलदारांनी त्यांच्यावर सतत नजर ठेवणे अपेक्षित असताना, गेल्या महिन्यात सिडकोतील पवननगर येथे ७ एप्रिल रोजी रात्री दोन गटांत सशस्त्र हाणामारी होत गोळीबाराच्या फैरी एकमेकांवर झाडल्या गेल्या होत्या.

यात सराईत गुन्हेगार संशयित दर्शन उत्तम दोंदे (२९), गणेश दत्तात्रय खांदवे (२८), अक्षय गणपत गावंजे आणि जितेंद्र अशोक चौधरी उर्फ छोट्या काळ्या (३६, सर्व रा. सिडको) यांच्याविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

सराईत गुन्हेगारांच्या टोळीतील गुन्हेगारांवर दत्तक गुन्हेगार योजनेतंर्गत अंबड पोलिस ठाण्यातील चार अंमलदारांना प्रत्येकी एक गुन्हेगार दत्तक देण्यात आलेला होता. असे असतानाही, या संशयितांकडून गंभीर स्वरुपाचा गुन्हा घडल्याने संबंधित अंमलदारांना परिमंडळ दोनच्या पोलीस उपायुक्तांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. (latest marathi news)

Nashik Police
Nashik Lok Sabha Police Alert : सोशल मीडियावर सायबर पोलिसांचा ‘वॉच’! सायबरची स्वतंत्र टीम 24X7 दक्ष

तसेच, अंबड विभागाच्या सहायक आयुक्तांनी त्यासंदर्भात लेखी विचारणा या अंमलदारांकडे केल्याचेही समजते. चारही पोलिस अंमलदारांनी केलेला खुलासा असमाधानकारक असल्याचा ठपका ठेवत परिमंडळ दोनच्या पोलिस उपायुक्तांनी चारही अंमलदारांना प्रत्येकी एक हजार रुपयांचा आर्थिक दंड ठोठावला आहे.

या अंमलदारांना उपायुक्तांच्या कारवाईविरोधात दोन महिन्यात महासंचालक कार्यालयात अपिल करता येणार आहे. मात्र, कारवाईमुळे आयुक्तालय हद्दीत नेमण्यात आलेल्या अंमलदारांना चांगलाच दणका बसला असून, आप-आपल्या दत्तक गुन्हेगारांच्या हालचालीवर बारकाईने नजर अंमलदारांकडून ठेवली जात आहे.

अशी आहे योजना

पोलीस आयुक्तालयाच्या १३ पोलीस ठाण्यांतील सराईत गुन्हेगारांची माहिती संकलित करण्यात आली आहे. त्या-त्या पोलीस ठाण्यांतर्गत गुन्हेगारांच्या हालचालीवर नजर ठेवण्यासाठी दत्तक गुन्हेगार योजना सुरू केली आहे. पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगारासाठी एक अंमलदार नेमण्यात आला आहे. गुन्हेगाराच्या हालचालीवर नजर ठेवताच, त्याला गुन्हेगारीपासून परावृत्त करण्यासाठी अंमलदाराने प्रयत्न करायचे आहेत. वेळोवेळी त्याची माहिती घेऊन ती वरिष्ठ अधिकाऱ्यांना द्यावयाची आहे. 

Nashik Police
Nashik Police: पोलीस महासंचालकांनी घेतला सुरक्षा यंत्रणेचा आढावा! लोकसभा निवडणुक, पंतप्रधान सभेच्या पार्श्वभूमीवर सूचना

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com