Nashik Crime: मुंबई सायबर क्राईम ब्रँचमधून फोन आला तर सावधान! सायबर भामट्यांकडून होऊ शकते फसवणूक; इंजिनिअरला घातला लाखांचा गंडा

Crime News : सॉफ्टवेअर इंजिनिअरला संशयित सायबर भामट्याने मनीलाँड्रिंग अन्‌ ड्रग्स तस्करी केल्याचे सांगत ३५ लाखांना गंडा घातला आहे.
Cyber Crime
Cyber Crimeesakal

Nashik Crime : गेल्या आठवड्यातील नाशिकमधील एका व्यावसायिकाला ‘मुंबई सायबर क्राईम ब्रँच’मधून बोलत असल्याचे सांगत तुमच्या मोबाईल फोनचा वापर करून मनीलॉड्रिंग झाल्याने कारवाईपासून सुटका करायच्या नावाखाली लाखोंची फसवणूक केली.

असा प्रकार पुन्हा घडला असून सॉफ्टवेअर इंजिनिअरला संशयित सायबर भामट्याने मनीलाँड्रिंग अन्‌ ड्रग्स तस्करी केल्याचे सांगत ३५ लाखांना गंडा घातला आहे. त्यामुळे पुन्हा असा फोन आल्यास कोणताही आर्थिक व्यवहार न करता नाशिक सायबर पोलिसांशी संपर्क साधावा. अन्यथा आपली फसवणूक होऊ शकते. (Nashik Crime Beware call from Mumbai Cyber ​​Crime Branch)

नाशिक सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील एका सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या युवकाला गेल्या मे महिन्यात स्काईपवरून संपर्क साधला आणि स्वत:चे नाव कुलदीप सिंग सांगत मुंबई सायबर क्राईम ब्रँच, अंधेरी येथून बोलत असल्याचे सांगितले. तसेच, यावेळी संशयिताने इंजिनिअर युवकाला सांगितले की तुझे आधारकार्डचा वापर करून मनीलॉड्रिंग आणि ड्रग्सची तस्करी करण्यात आल्याचे सांगितले.

यामुळे सदरचा युवक घाबरून गेला. याचाच फायदा घेत संशयिताने वारंवार व्हॉटसॲप व स्काईपवरून संपर्क साधत व चॅटिंगद्वारे धमकावत यातून सुटका करण्याची असल्यास पैशांची मागणी केली. या सततच्या फोनमुळे इंजिनिअर युवकास संशयित सायबर भामट्याने बँक खात्यातील रक्कम त्याने सांगितलेल्या बँकेच्या खात्यात वर्ग करण्यास सांगितले. (latest marathi news)

Cyber Crime
Nashik Cyber Crime : वर्क फ्रॉम होम, शेअर ट्रेडिंगचे आमिष भोवले! सायबर भामट्यांनी घातला चौघांना 60 लाखांना घातला गंडा

त्यानुसार संशयिताने वारंवार मागणी करीत ३५ लाख ६४ हजार २३ रुपये वर्ग करून घेत फसवणूक केली आहे. सदरचा प्रकार ५ ते ९ मे या दरम्यान घडला आहे. इंजिनिअर युवकाला फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्याने नाशिक सायबर पोलिसात धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार, फसवणूक व आयटी ॲक्टअन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रियाज शेख हे तपास करीत आहेत.

फसू नका, संपर्क साधा

"मुंबई सायबर क्राईम ब्रँचमधून कोणालाही फोनवरून संपर्क साधला जात नाही. त्यामुळे असा फोन कोणाला आल्यास त्यावर विश्वास न ठेवता सायबर पोलीसांशी संपर्क साधावा. अन्यथा फसवणूक होऊ शकते. तसेच कोणत्याही धमकीला न घाबरता आर्थिक व्यवहार करू नका असे नागरिकांना आवाहन आहे."

- रियाज शेख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, शहर सायबर पोलीस ठाणे.

Cyber Crime
Pune Cyber Crime : गंभीर गुन्ह्यात अटक होण्याची भीती दाखवून कॉम्प्युटर इंजिनिअर तरुणीची फसवणूक; घातला साडे बारा लाखांना गंडा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com