Nashik Crime News : दुचाकी चोरास अटक! 4 दुचाकी हस्तगत; मुंबई नाका ठाण्याच्या पोलिसांची कामगिरी

Crime News : मुंबई नाका गुन्हे शोध पथकाचे पोलिस शिपाई गणेश बोरणारे यांना भारत नगर येथे एक जण चोरीच्या दोन दुचाकी विक्रीस येत असल्याची माहिती मिळाली
The four stolen bikes and the suspects have been seized by the Mumbai Crime Squad, officers and staff
The four stolen bikes and the suspects have been seized by the Mumbai Crime Squad, officers and staffesakal

जुने नाशिक : मुंबई नाका पोलिसांकडून सापळा रचून दुचाकी चोरास ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून चोरीच्या चार दुचाकी हस्तगत केल्या. मुंबई नाका पोलिस ठाणे २, इंदिरानगर आणि गंगापूर पोलिस ठाणे प्रत्येकी १ असे चार गुन्हे उघडकीस आले आहेत. (Nashik Crime Bike thief arrested news)

मुंबई नाका गुन्हे शोध पथकाचे पोलिस शिपाई गणेश बोरणारे यांना भारत नगर येथे एक जण चोरीच्या दोन दुचाकी विक्रीस येत असल्याची माहिती मिळाली. वरिष्ठांना माहिती दिली. मंगळवारी (ता.७) सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक गिरी, निरीक्षक गुन्हे श्रीनिवास देशमुख यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक निसार शेख, सहाय्यक उपनिरीक्षक रोहिदास सोनार, कर्मचारी समीर शेख, नवनाथ उगले, गणेश बोरणारे यांनी भारत नगर भागात सापळा रचला. (Latest Marathi News)

The four stolen bikes and the suspects have been seized by the Mumbai Crime Squad, officers and staff
Navi Mumbai Crime: परदेशात नोकरीला लावण्याचे आमिष दाखवून बेरोजगारांची फसवणूक, 23 जणांकडून उकळले...!

संशयित सोहेल ऊर्फ बाबू पप्पू अन्सारी (रा. भारत नगर) दुचाकी घेऊन उभा असल्याचे आढळला. पोलिसांची चाहूल लागताच संशयिताने पळ काढला. पोलिसांनी पाठलाग करून त्यास ताब्यात घेतले. त्याच्याकडे चोरीच्या दोन दुचाकी मिळून आल्या.

त्यास ताब्यात घेत त्याची कसून चौकशी केली. अन्य दोन दुचाकी चोरी केल्याची कबुली त्याने दिली. एम एच १५ बीसी ४०७०, एम एच १५ इके ६०२०, एम एच ३७ ए एफ ५३०७, एम एच १५ एफ वाय ९५८६ अशा चार दुचाकी त्याच्याकडून हस्तगत केल्या.

The four stolen bikes and the suspects have been seized by the Mumbai Crime Squad, officers and staff
Nashik Crime News : वॉशिंग मशिनमध्ये ठेवलेले दागिने चोरीला; इंदिरानगरमधील घटना

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com