Nashik Crime News : अट्टल सोनसाखळी चोरट्याच्या आवळल्या मुसक्या! स्थानिक गुन्हेशाखेची कामगिरी; 15 गुन्ह्यांची उकल

Crime News : नाशिक ग्रामीणच्या स्थानिक गुन्हेशाखेच्या पथकाने या सोनसाखळी चोरट्याला चांदोरी फाट्यावर सापळा रचून अटक केली असून, १५ गुन्ह्यांची उकल झाली आहे.
arrested
arrestedesakal

Nashik Crime News : लगतच्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये १३ तर नाशिक आयुक्तालय हददीमध्ये दोन सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यातील अट्टल सोनसाखळी चोरट्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. नाशिक ग्रामीणच्या स्थानिक गुन्हेशाखेच्या पथकाने या सोनसाखळी चोरट्याला चांदोरी फाट्यावर सापळा रचून अटक केली असून, १५ गुन्ह्यांची उकल झाली आहे. (Nashik Crime chain snatcher arrested by local crime branch 15 crimes solved marathi news)

योगेश सीताराम पाटेकर (२२, रा. वडाळा महादेव, श्रीरामपूर, जि. अहमदनगर) असे अटक करण्यात आलेल्या सोनसाखळी चोरट्याचे नाव आहे. शुक्रवारी (ता. १९) सोनगाव फाटा (ता. निफाड) येथे पादचारी महिलेच्या गळ्यातील दीड तोळ्याची सोन्याची पोत दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी हिसकावून नेली होती. याप्रकरणी सायखेडा पोलिसात जबरी चोरीचा गुन्हा दाखल होता. याच गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हेशाखा करीत होत.

संशयित पाटेकर हा चांदोरी फाटा परिसरात येणार असल्याची खबर स्थानिक गुन्हेशाखेच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार, पथकाने सापळा रचून संशयित योगेश पाटेकर यास अटक केली. त्याच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्याने विनोद चव्हाण या साथीदाराच्या मदतीने सोनसाखळी चोरीची कबुली दिली. (latest marathi news)

arrested
Crime News: बोगस सोने देऊन बँकेला ३८ लाखांना गंडा; वाचा नक्की काय घडल

संशयित पाटेकर याच्याकडून अर्धवट तुटलेली चैन, इलेक्ट्रॉनिक वजनकाटा, दुचाकी असा १ लाख १ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. चौकशीतून १५ जबरी चोरीच्या गुन्ह्याची उकल झाली आहे. यात आडगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत त्याने २०२१ मध्ये दोन सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्याचा समावेश आहे. तपासाकामी त्यास सायखेडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कामगिरी स्थानिक गुन्हेशाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू सुर्वे, उपनिरीक्षक दत्ता कांभिरे, विनोट टिळे, हेमंत गरुड, गौरव पगारे, प्रदीप बहिरम, हेमंत गिलबिले यांनी बजावली.

दाखल गुन्हे

आडगाव पोलीस ठाणे - २, श्रीरामपूर शहर - ३, श्रीरामपूर तालुका - २, भिंगार कॅम्प - १, संगमनेर शहर -१, संगमनेर तालुका -१, कोतवाली - १, राहुरी -१, लोणी - १, नेवासा -१, जवाहरनगर (संभाजीनगर) - १ 

arrested
Navi Mumbai Crime: पोलिसांनी केली मोठी कारवाई; तब्बल १० लाखांचा एमडी जप्त

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com