Nashik Crime News: सराईत गुन्हेगार माले यास सिनेस्टाईल अटक! गोळीबारासह अनेक गुन्हे दाखल; अखेर लागला पोलिसांच्या हाती

Crime News : त्याच्याकडे देशी गावठी कट्टा व जिवंत काडतुसही हस्तगत करण्यात आले असून, इंदिरानगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Sarait criminal Rohit Male has been arrested and the gavathi katta seized from him. including the Special Squad of the City Crime Branch. In another photograph, the suspect is Rohit Male.
Sarait criminal Rohit Male has been arrested and the gavathi katta seized from him. including the Special Squad of the City Crime Branch. In another photograph, the suspect is Rohit Male.esakal

Nashik Crime News : गोळीबार, खून, खूनाचा प्रयत्न, विनयभंगाचा मारहाणीसारख्या गंभीर गुन्ह्यात फरार असलेल्या सराईत गुन्हेगाराला अखेर इंदिरानगर पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करीत अटक केली आहे. त्याच्याकडे देशी गावठी कट्टा व जिवंत काडतुसही हस्तगत करण्यात आले असून, इंदिरानगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, गेल्या डिसेंबर महिन्यात पवननगर परिसरात हवेत गोळीबार केल्याप्रकरणातही तो असताना त्याच्याविरोधात दोन दिवसांनी गुन्हा दाखल झाला होता. त्यावेळी पवननगर परिसरातील एक माजी नगरसेवकही त्यावेळी घटनास्थळी उपस्थित असल्याची चर्चा शहरभर रंगली होती. (Nashik Crime Cinestyle Arrest of Criminal rohit dingam)

रोहित गोविंद डिंगम उर्फ माले (२७, रा. फर्नांडीसवाडी, उपनगर) असे बेड्या ठोकण्यात आलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी रेकॉर्डवरील गुन्हेगारांना अटकाव करण्याचे आदेश दिलेले आहेत. त्यानुसार गुन्हे शाखेच्या विशेष पथकाचे सहायक निरीक्षक हेमंत नागरे यांना संशयित रोहित हा इंदिरानगर परिसरातील चेतनानगर परिसरास असल्याची खबर मिळाली होती.

वरिष्ठ निरीक्षक जयराम पायगुडे यांच्या सूचनेप्रमाणे, सहायक उपनिरीक्षक रंजन बेंडाळे, अंमलदार बाळा नांद्रे, चंद्रकांत बागडे, विठ्ठल चव्हाण, गणेश वडजे, अर्चना भड, दत्तात्रय चकोर, देवकिसन गायकर आणि भूषण सोनवणे यांच्या पथकाने सापळा रचून सराईत गुन्हेगार माले याच्या मुसक्या आवळल्या आहेत. याप्रकरणी इंदिरानगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

असा केला जेरबंद

विशेष पथक सराईत गुन्हेगार रोहितच्या माग काढत इंदिरानगर परिसरातील चेतनानगरमधील राज टॉवर याठिकाणी पोहोचले. अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सोसायटीला वेढा घालत संशयित रोहितवर पाळत ठेवली असता, त्यास पोलिसांचा संशय आला. त्यामुळे त्याने टॉवरच्या तेराव्या मजल्यावरील फ्लॅटच्या गॅलरीतून पाइपने थेट टेरेसवर पोहोचला.

त्यावेळी टेरेसवरील पोलिसांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता, तो दुसऱ्या विंगच्या दिशेने पळाला. मात्र, पोलिसांनी सोसायटीला चहुबाजुंनी वेढा घातलेला असल्याने त्यांनी रोहिताचा पाठलाग केला. ही सारी पळापळ पाहून रहिवाशांचीही गर्दी झाली. पोलिसांनी तब्बल दीड किलोमीटरपर्यंत संशयित रोहित याचा पाठलाग करीत त्याच्या मुसक्या आवळून त्यास बेड्या ठोकल्या आहेत. (latest marathi news)

Sarait criminal Rohit Male has been arrested and the gavathi katta seized from him. including the Special Squad of the City Crime Branch. In another photograph, the suspect is Rohit Male.
Jalgaon Crime News : भुसावळातील ‘गँगवॉर’ची धग संपता संपेना..! धंद्यावर पकड ठरले कारण

बेद गँगचा सदस्य

मार्च २०२४ मध्ये परिमंडळ दोनच्या उपायुक्त मोनिका राऊत यांनी नाशिकरोड, उपनगर परिसरात दहशत माजविणाऱ्या बेद टोळीविरुद्ध मोक्का लावला. या टोळीत संशयित रोहित मालेचाही समावेश आहे. १४ डिसेंबर २०२३ रोजी मध्यरात्री साडेबारा वाजता सिडकोतल्या पवननगर येथे हवेत गोळीबार केल्याची घटना घडली होती.

याप्रकरणी शहरभर वाच्यता होऊनही अंबड पोलिसांनी दोन दिवसांनी रोहितविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. परंतु या गुन्ह्यात पोलिसांनी त्यास अटक केलेली नव्हती. या घटनेवेळी भाजपचा एक माजी नगरसेवकही हजर होता. परंतु त्यानेही पोलिस तपासामध्ये सहकार्य केले नसल्याची चर्चा त्यावेळी रंगली होती.

दरम्यान, रोहित याच्या अटकेनंतर अंमलदार संजय ताजणे, गणेश भामरे, भारत डंबाळे, रवींद्र दिघे, मंगला जगताप व सविता कदम यांनी चौकशी केली असता, बऱ्याच महिन्यांपासून फरार असलेला रोहित हाती लागल्याने अनेक गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता आहे.

Sarait criminal Rohit Male has been arrested and the gavathi katta seized from him. including the Special Squad of the City Crime Branch. In another photograph, the suspect is Rohit Male.
Jalgaon Crime News : नेपाळी नोकराचा साथीदारांच्या मदतीने सिनेस्टाईल दरोडा; व्यावसायिक राजा मयूर यांच्या घरी चोरी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com