

नाशिक : सिडकोतील दोन वर्षांपूर्वी रिपाइंचे पदाधिकार्यावरील गोळीबार प्रकरणात दीपक बडगुजर याचे नाव समोर आले आहे. दीपक हा उबाठा गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांचा मुलगा असून, गेल्या आठवड्यात याप्रकरणी मुख्य सूत्रधाराला अटक केल्याने दीपक यानेच गोळीबारीची ‘सुपारी’ दिल्याचे उघड झाल्याने पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे. दरम्यान दीपक गेल्या काही दिवसांपासून परदेशात असल्याचे समजते. (Deepak Badgujar gives possibility of arrest cidco firing case )