Nashik Bribe Crime : झेडपीच्या उपअभियंत्याला लाच घेताना रंगेहाथ अटक! रस्त्याच्या कामाच्या बिलापोटी मागितले 40 हजार

Bribe Crime : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मुंबई नाका परिसरातील लाचखोराच्या घरी सदरची कारवाई गुरुवारी (ता.९) सायंकाळी केली.
Bribe Crime
Bribe CrimeESAKAL

Nashik Bribe Crime : सुरगाणा तालुक्यातील दोन गावांचे सिमेंट काँक्रिटचे रस्ते बनविण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर ठेकेदाराकडून २ टक्केप्रमाणे ४० हजार रुपयांची लाच स्वीकारताना सुरगाणा उपविभागाचा उपअभियंत्याला त्याच्या निवासस्थानी रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मुंबई नाका परिसरातील लाचखोराच्या घरी सदरची कारवाई गुरुवारी (ता.९) सायंकाळी केली. (Nashik crime Deputy Engineer of ZP arrested red handed taking bribe)

नंदलाल विक्रम सोनवणे (५५)  असे अटक करण्यात आलेल्या लाचखोर उपअभियंत्याचे नाव आहे. सोनवणे हे जिल्हा परिषदेच्या सुरगाणा उपविभागात उपअभियंता म्हणून कार्यरत होते. तक्रारदार हे ठेकेदार असून, त्यांना जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अभियंत्यांकडून सुरगाणा तालुक्यातील दोन गावांना सिमेंट काँक्रिटचे रस्ते बनविण्याचे काम देण्यात आले होते.

या कामावर लाचखोर सोनवणे यांना देखरेख करण्याचे अधिकार दिलेले होते. ठेकेदाराने सदरील काम विहित वेळेत पूर्ण करून दिले होते. परंतु त्यांना सदरील काम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र देण्यात आलेले नव्हते.  तक्रारदार यांना सदरील प्रमाणपत्र देण्याचे मोबदल्यात दोन्ही कामासाठीच्या मंजूर निविदा रक्कम २० लाख रुपयांच्या 2 टक्केप्रमाणे लाचखोर सोनवणे यांनी बुधवारी (ता. ८) ४० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.  (Latest Marathi News)

Bribe Crime
Nashik Bribe Crime : जिल्हा न्यायालयाचा सहायक अधीक्षक ACBच्या जाळ्यात! अवघ्या 500 रुपयांच्या लाचप्रकरणी अटक

तक्रारदार यांनी यासंदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार विभागाने पडताळणी केल्यानंतर गुरुवारी (ता. ९) सापळा रचण्यात आला. संशयित लाचखोर सोनवणे याने मुंबई नाका परिसरात असलेल्या त्याच्या निवासस्थानी तक्रारदार यास लाचेची ४० हजारांची रक्कम घेऊन सायंकाळी बोलावले.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा लावला आणि सोनवणे  याने पंचासमक्ष तक्रारदाराकडून ४० हजारांची लाच स्वीकारली असता, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यांना रंगेहाथ अटक केली. याप्रकरणी मुंबई नाका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कामगिरी अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप घुगे, गणेश निंबाळकर, नितीन नेटारे यांनी बजावली.

Bribe Crime
Nashik Bribe Crime: प्रसुती रजेवर असताना पुरातत्त्वच्या सहायक संचालिकेने स्वीकारली लाच! संचालक पसार: ACBच्या पथकाकडून शोध सुरू

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com