crime
crimeesakal

Nashik Crime News : सातपूरला साडेनऊ लाखाची वीजचोरी; 2 गुन्हे दाखल

Nashik Crime : सातपूर परिसरात फळांच्या गोडावूनसह अ‍ॅक्वा युनिटसाठी राजरोस वीज चोरी केली जात असल्याचे महावितरणने टाकलेल्या छाप्यात पुढे आहे.

Nashik Crime News : सातपूर परिसरात फळांच्या गोडावूनसह अ‍ॅक्वा युनिटसाठी राजरोस वीज चोरी केली जात असल्याचे महावितरणने टाकलेल्या छाप्यात पुढे आहे. दोन घटनांमध्ये तब्बल ७० हजार २८८ युनिटची वीज चोरी करण्यात आली असून, यामुळे वीज कंपनीचे सुमारे साडेनऊ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. याबाबत नाशिक रोड पोलिस ठाण्यात दाखल झालेले गुन्हे सातपूर पोलिसांकडे वर्ग करण्यात आले आहे. ()

ठाणे येथील भरारी पथकाने दोन दिवसांपूर्वी पाथर्डी शिवारात छापेमारी करीत वीज चोरीचे प्रकार उघडकीस आणले. त्यामुळे खडबडून जागे झालेल्या महावितरणचे मुख्यालय असलेल्या नाशिक रोड कार्यालयाने छापेमारी सुरू केली आहे. या पथकांनी सातपूर भागात छापे टाकून दोन व्यावसायीक वीज चोरीचे उघडकीस आणले आहेत.

पिंपळगाव बहुला येथील साई तीर्थ अ‍ॅक्वा युनिट मध्ये वीज चोरी होत असल्याची माहिती पथकाला मिळाली होती. त्यानुसार छापा टाकला असता येथे तब्बल १२ हजार ८ युनिटची वीज चोरी करण्यात आल्याचा प्रकार समोर आला.

crime
Nashik Crime News : अवैधरीत्या शस्त्र बाळगणाऱ्यांची धरपकड; आठवड्यात शहरातून 24 संशयितांना अटक

याबाबत आशिष चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गोकुळ भगवान भावले (रा. पिंपळगाव बहुला) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, संबंधितांनी २ लाख ७० हजार २३० रुपयांचे वीज कंपनीचे नुकसान केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. दुसरा प्रकार औद्योगीक वसाहतीतील सर्व्हे नं. ४१६- १ येथील फळ साठवणूक गोडावूनमध्ये उघडकीस आला.

या ठिकाणी ५८ हजार २८० युनिटची वीज चोरी झाली. याबाबत कुणाल फ्रूट एजन्सीच्या मालक अरूची विनय चव्हाण (रा. सातपूर) यांच्याविरुद्ध पोलिस दप्तरी गुन्हा दाखल करण्यात आला असून चव्हाण यांनी वीज कंपनीचे सुमारे ६ लाख ७८ हजार ९३० रुपयांचे नुकसान केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याबाबत वीज कंपनीचे विद्युतकुमार पवार यांनी फिर्याद दिली आहे.

crime
Nashik Crime News : अल्‍पवयीनांच्‍या दप्तरात प्राणघातक शस्‍त्रे; अवैध हत्‍यार बाळगणाऱ्यांचा सुळसुळाट

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com