Nashik Fraud Crime : एटीएम कार्ड वापरून 38 हजार रुपयांची फसवणूक

Fraud Crime : ओटीपी घेऊन पिन जनरेट करून एटीएम कार्ड बदलले व अकाउंटमधून ३८ हजार रुपये काढून घेऊन एकाची फसवणूक केल्याची घटना ओझर येथे घडली.
crime
crime esakal

Nashik Fraud Crime : तुमचे एटीएम पिन जनरेट करून एटीएम कार्ड ॲक्टिव्हेट करून देतो असे सांगून मोबाईलवर आलेला ओटीपी घेऊन पिन जनरेट करून एटीएम कार्ड बदलले व अकाउंटमधून ३८ हजार रुपये काढून घेऊन एकाची फसवणूक केल्याची घटना ओझर येथे घडली. मंगळवारी (ता.३०) सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास अमोल अशोक चंदनशीव (रा. पिंपळस रामाचे, ता. निफाड) हे एटीएम पिन जनरेट करून एटीएम कार्ड ॲक्टिव्हेट करण्यासाठी ओझर येथील बडोदा बँकेच्या एटीएममध्ये आले होते. ( Fraud of 38 thousand rupees using ATM card )

तेथे एका अनोळखी व्यक्तीने चंदनशीव यांना तुमचे एटीएम कार्ड ॲक्टीव्हेट करून देतो, अशी बतावणी करून चंदनशीव यांचे एटीएम कार्ड स्वतःकडे ठेवून लबाडीने दुसऱ्या व्यक्तीच्या नावाचे एटीएम कार्ड चंदनशीव यांना देऊन निघून गेला. चंदनशीव यांचे अकाउंटमधून एटीमकार्डद्वारे नाशिक येथून ३८ हजार रुपये काढून घेतले.

crime
Nashik Fraud Crime : नोकरीच्या आमिषाने 7 जणांची फसवणूक; 27 लाखांना गंडविले; निमगव्हाणच्या एकाविरोधात गुन्हा

यामुळे फसवणुकीची तक्रार अमोल चंदनशीव यांनी दिली आहे. ओझर पोलिसांनी अनोळखीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सहाय्यक पोलिस उपनिरिक्षक डी एल वाघेरे करत आहेत.

crime
Nashik Fraud Crime : ग्राहकांचे दागिने घेऊन सोनार पसार; अमृतधाम परिसरातील प्रकार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com