Nashik Crime News : पंचवटीतच अवैध सावकारीचे अड्डे! गुंडाकरवी वसुली; पोलिस राबविणार धडक मोहीम

Crime News : अवैध सावकाराच्या जाचाला कंटाळून अनेकांनी आत्महत्या केल्याच्या घटना यापूर्वी घडलेल्या असून, त्यातील बहुतांशी संशयित अवैध सावकार हे पंचवटी परिसरातीलच असल्याचे समोर आलेले आहे.
Crime News
Crime Newsesakal

Nashik Crime News : शहरात परवानाधारक सावकारांशिवाय अवैध सावकारी करणाऱ्यांचे प्रस्थ तयार झाले असून, पंचवटी परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध सावकार असल्याचे नेहमीच बोलले जाते. अवैध सावकाराच्या जाचाला कंटाळून अनेकांनी आत्महत्या केल्याच्या घटना यापूर्वी घडलेल्या असून, त्यातील बहुतांशी संशयित अवैध सावकार हे पंचवटी परिसरातीलच असल्याचे समोर आलेले आहे.

त्यामुळे अवैध सावकारीचा अड्डा पंचवटीमध्येच असल्याचे आता उघडपणे बोलले जाते. येत्या काळात पोलिसांकडून अशा अवैध सावकारीविरोधात धडक मोहीम राबविण्यात येणार असल्याचे संकेत दिले आहेत. (Nashik Crime Illegal money lenders hideout in Panchavati news)

आर्थिक चणचण कोणालाही सांगून येत नाही. अशावेळी अनेकांचे पावले अवैध सावकाराच्या दाराकडेच वळतात. परंतु शहरात अवैध सावकारी करणारे बहुतांशी हे पंचवटी परिसरातीलच असल्याचे सांगितले जाते. खासगी पतसंस्था, फायनान्स कंपन्या आणि बँकांमधून तत्काळ पैसे उपलब्ध होत असले तरी त्यासाठीची प्रक्रिया आणि कागदपत्रांची झंझट अनेकांना नको असते.

त्यामुळे अनेकजण अवैध सावकाराकडून ५ टक्के दरमहा व्याज वा त्यापेक्षाही अधिकच्या व्याजाने पैसे घेतात. सुरवातीचे व्याजाची परतफेडही होते. परंतु नंतर व्याज भरून-भरून कर्जदाराकडून कर्ज फेडले जात नाही. त्यामुळे व्याजाची रकमा फुगून अवैध सावकाराकडून तगादा सुरू होतो.

वेळप्रसंगी गुंडांचीही मदत घेत दिवसरात्र कर्जदाराला धमकावले जाण्याचे प्रकार केले जातात. या साऱ्या त्रासाला वैतागून कर्जदार एकतर आत्महत्या करतो वा त्याच्याकडील जे काही असेल ते विकून कर्ज फेडतो. परंतु यातील कोणीही पोलिसांकडे दाद मागत नाही. कर्जदाराने आत्महत्या केली तरच गुन्हा दाखल होतो आणि घटनेला वाचा फुटते.

अवैध सावकारी करणाऱ्यांचे प्रस्थ शहरातील पंचवटी परिसरामध्ये मोठ्याप्रमाणात आहे. याच परिसरात मोठ्या संख्येने व्यापारी, व्यावसायिक राहतात. अवैधरीत्या सुरू असलेल्या या व्यवसायातून अनेकांच्या गडगंज मालमत्ता झाल्या आहेत.

पांढरपेशा म्हणवून घेणारेही अवैध सावकारी करतात. ५ ते २५ टक्के व्याजदराने रकमा दिल्या जातात. दिवसाढवळ्या व्हाइट कॉलर फिरणाऱ्या पंचवटीतील बहुतांशी राजकीय पदाधिकारी, व्यावसायिक अन्‌ मोठ्या पदावरील नोकरदारही अवैध सावकारी करण्यामध्ये गुंतलेले आहेत. (latest marathi news)

Crime News
Nashik Bribe Crime : विहितगावला लाचखोर तलाठ्याला अटक

‘फास’ कायम

सन २०२२ च्या सुरवातीला सातपूरमध्ये खासगी सावकारीला त्रासून तरुणाने आत्महत्या केली. तर, डिसेंबर २०२२ मध्ये पाथर्डी फाटा परिसरात एका दाम्पत्याने खासगी सावकारांच्या धमक्यांसह मागणीला वैतागून आत्महत्या केली. सातपूरमध्येही दोन भावांसह वडिलांनी आत्महत्या केली. उपनगर हद्दीतही दोन तरुण भावांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्यावर एकाचा मृत्यू झाला.

तर, पंचवटीत एका खासगी सावकाराने महिलेचा विनयभंग केला. यासह गॅरेज मालक आणि हॉटेल मालकाला सावकारांनी धमक्या दिल्याचे प्रकार सन २०२३ मध्ये उघड झाले. पोलिसांसह निबंधक कार्यालयाने याप्रकरणी अनेकांवर गुन्हे नोंदवूनही अवैध सावकारीचा ‘फास’ शहरात कायम असल्याने अनेक कुटुंबीय तणावग्रस्त होत आहेत.

कायदा असा...

बेकायदेशीर सावकारी बंद व्हावी म्हणून, महाराष्ट्र सावकारी (नियमन) अध्यादेश २०१४ हा सुधारित कायदा लागू आहे. त्याअन्वये विनापरवाना आणि अवैध सावकारी केल्यास गुन्हा दाखल होतो. या गुन्ह्यात आरोपीला पाच वर्षापर्यंत कारावास किंवा ५० हजार रुपयांपर्यंत दंडाची तरतूद आहे.

प्रशासकीय उदासीनता

अवैध सावकारीविरोधात उपनिबंधक कार्यालयाकडे तक्रारी केल्या जात असतात. परंतु अद्यापपर्यंत उपनिबंधक कार्यालयाकडून अशा सावकारांविरोधात कठोर कारवाई झालेली नाही. सावकाराच्या जाचातून पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर तात्पुरत्या स्वरूपाची कारवाई होते. यातून संबंधित विभागाची उदासीनताच निदर्शनास येते.

"अवैध सावकारीमुळे जाचाला सामोरे जावे लागत असल्यास अशांनी पोलिसांकडे तक्रार करावी. तसेच, अवैध सावकारी कोणी करीत असेल तर त्याचीही माहिती कळवावी. उपनिबंधक कार्यालयाच्या समन्वयातून पोलिस संयुक्तरित्या कारवाई करून गुन्हे दाखल करील."

- किरणकुमार चव्हाण, पोलिस उपायुक्त, परिमंडळ एक.

Crime News
Crime News: १९९५ मध्ये हत्या, २९ वर्षांनी अटक पोलिसांनी केली अटक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com