Seized Material
Seized Materialesakal

Nashik Crime News : पिकअप जीपमधून गांजाची अवैध वाहतूक; कथित साधूसह तिघांना वावी पोलिसांनी पकडले रंगेहात

Crime News : या कारवाईत चिंचोली गुरव ता संगमनेर येथील कथीत साधुसह आणखी दोघांना अटक करण्यात आली

वावी : सिन्नर तालुक्यातील नांदूर शिंगोटे शिवारात चासखिंडीमध्ये वावी पोलिसांनी केलेल्या कारवाईत पिकप जीप मधून वाहतूक करण्यात येणारा ८६ हजार रुपये किमतीचा साडेचार किलो गांजा हस्तगत करण्यात आला. या कारवाईत चिंचोली गुरव ता संगमनेर येथील कथीत साधुसह आणखी दोघांना अटक करण्यात आली. (Nashik Crime Illegal transportation of ganja from pickup jeep news)

चास - नांदूरशिंगोटे मार्गे गांजाची अवैध वाहतूक होणार असल्याची गुप्त माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक संदेश पवार यांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी नांदूर शिंगोटे शिवारात चासखिंडीमध्ये वाहनांची तपासणी सुरू केली होती. त्यावेळी रस्त्यापासून आत काही अंतरावर संशयास्पद उभ्या असलेल्या महिंद्रा पीकअप जीप एमएच १७ सीव्ही १५८१ मध्ये पांढऱ्या रंगाच्या गोण्यांमध्ये गांजा मिळून आला. पोलिसांनी पिकप मधील कथित साधू

योगी पवननाथ बाबा शक्तीनाथ (३९) धंदा पुजारी, रा. पुष्कर (राजस्थान), हल्ली राहणार स्वामी समर्थ केन्द्रा जवळ, चिंचोली गुरव ता. संगमनेर , जीप चालक गोरख गोपीनाथ भादेकर (४१) रा.चिंचोली गुरव, शरद रामनाथ शेळके (४३) रा. नांदूरशिंगोटे या तिघांना ताब्यात घेतले. (Latest Marathi News)

Seized Material
Crime News : दारूच्या वादातून मित्रांनीच केली कुख्यात बॅटरीची हत्त्या

त्यांचें जवळून तीन गाण्यांमध्ये भरलेला चार किलो ३०० ग्रॅम वजन असलेला ८६ हजार रूपये किमतीचा गांजा, १३ हजार रूपये किमतीचे दोन मोबाईल फोन, सात लाख रूपये किमतीची पीकअप जीप जप्त करण्यात आली. सहाय्यक निरीक्षक संदेश पवार, उपनिरीक्षक बाळासाहेब आहेर, पारस वाघमोडे, हवालदार हेमंत कदम, साहेबराव बलसाने, किरण पवार, महिला पोलीस शिपाई चव्हाण यांनी या कारवाईत सहभाग घेतला.

Seized Material
Crime News: ऐरोली खाडीपुलावर दीड कोटींची रोकड जप्त, निवडणुकीसाठी आणली होती रक्कम?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com