Nashik Crime : कपाटाची चावी बनवून देण्याच्या बहाण्याने लाखोंच्या दागिन्यांवर डल्ला; मनमाडच्या गांधी चौकातील घटना

Crime News : शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या गांधी चौकात कपाटाची चावी बनवून देतो, असे सांगत आठ लाख २६ हजार रुपये किमतीचे सोने-चांदीच्या दागिन्यांवर अज्ञात व्यक्तीने डल्ला मारल्याची घटना घडली.
Crime
Crime esakal

मनमाड : शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या गांधी चौकात कपाटाची चावी बनवून देतो, असे सांगत आठ लाख २६ हजार रुपये किमतीचे सोने-चांदीच्या दागिन्यांवर अज्ञात व्यक्तीने डल्ला मारल्याची घटना घडली. यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. गेल्या काही महिन्यांपासून शहरात चोरीचे प्रमाण वाढल्याने संबंधित पोलिस यंत्रणा करते तरी काय, असा प्रश्‍न नागरिकांनी उपस्थित केला आहे. (Nashik Crime Lakhs worth of jewelry stolen pretext of making cupboard key)

याप्रकरणी मनमाड पोलिस ठाण्यात नंदा शंकर गवळी (वय ६०, रा. गवळी वाडा, गांधी चौक, मनमाड) यांनी फिर्याद दिली आहे. घरामध्ये एकटी असताना सकाळी अकराच्या सुमारास घरासमोरून चावी बनविणारा व्यक्ती गल्लीतून जाताना दिसला. कपाटाची चावी बनवायची असल्याने मी त्याला घरात बोलावून कपाटाची चावी बनविण्यास सांगितले.

सुमारे एक तास तो कपाटाची चावी बनवत होता. त्यानंतर त्याने एक चावी कपाटाच्या लॉकमध्ये फसवून तोडून टाकली. चावी काढण्यासाठी माझ्या भावाला बोलावून घेतो, असे सांगून तो घरातून बाहेर पडला. मात्र, तो परतला नाही. आपण कपाट उघडून पाहिले असाता कपाट उघडत नव्हते. त्यामुळे त्याच दिवशी भाग्यलक्ष्मी बँकेजवळील चावी बनविणाऱ्या बोलावले. पण, तो आला नाही. त्यांनतर शहरातील आर. के. चावी बनविणाऱ्याने चावी बनवून दिली. (Latest Marathi News)

Crime
Crime News : भावाने काढला भावाचा काटा! चोवीस तासांत दोन खुनांनी हादरली उपराजधानी

कपाट उघडताच लॉकरमध्ये ठेवलेली दोन लाख रुपये किमतीची ४० ग्रॅम वजनाची जुनी वापरती सोन्याची तीन पदरी पोत, १ लाख २५ हजार रुपयांची २५ ग्रॅम वजनाचे जुने वापरते सोन्याचे मंगळसूत्र असलेली पोत, २ लाख २५ हजार रुपयांची ४५ ग्रॅम वजनाची जुनी वापरती सोन्याचे मंगळसूत्र असलेली पोत, ५० हजार रुपयांची १० ग्रॅम वजनाची जुनी वापरती सोन्याची माळ असलेली पोत,

५० हजार रुपयांची १० गॅम वजनाची जुनी वापरती सोन्याचे मंगळसूत्र असलेली पोत, २५ हजार रुपयांची ५ ग्रॅम वजनाची जुनी वापरती सोन्याच्या पंचाल्या, ६५ हजार रुपयांची १३ ग्रॅम वजनाची जुनी वापरती सोन्याची शॉर्ट पोत, ४० हजार रुपयांचे ८ ग्रॅम वजनाचे जुने वापरते सोन्याचे मणी व डोरले, २० हजार रुपयांची ४ ग्रॅम वजनाच्या जुन्या वापरत्या सोन्याच्या ३ अंगठ्या,

१५ हजार रुपयांची ३ ग्रॅम वजनाची सोन्याचे कानातले दागिने, ५ हजार रुपयांच्या १ ग्रॅम वजनाच्या जुन्या वापरत्या सोन्याच्या २ नथी, ६ हजार रुपयांचे १० तोळे चांदीचे दागिने व पायातील पट्ट्या असे ८ लाख २६ हजार रुपये किमतीच्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर डल्ला मारला. पोलिस निरीक्षक अशोक घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस तपास करीत आहेत.

Crime
Mumbai Crime: विवाहितेचे अडीच लाखांचे दागिने लुटले; वाचा संपूर्ण घटना

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com