
नाशिक : कामधंदा करीत नाही, म्हणून बोलल्याचा राग आल्याने जन्मदात्या आईचाच गळा आवळून खून करणार्या मुलाला नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेप आणि दोन हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली आहे. वडाळागावातील गणेश नगरमध्ये नोव्हेंबर २०१८ मध्ये सदरील घटना घडली होती. (Nashik Crime Life imprisonment for boy killed mother marathi news)
अल्लाउद्दीन कमरुद्दीन शेख असे शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. रुक्साना कमरुद्दीन शेख (६८, रा. गणेश नगर, वडाळागाव, इंदिरानगर) असे मयत महिलेचे नाव आहे. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी दुपारी साडेचार ते सात वाजेच्या दरम्यान सदरची घटना घडली होती.
आरोपी अल्लाउद्दीन हा काहीही कामधंदा करीत नसल्याने आई रुक्साना हिने त्यास कामधंदा करण्याचे सांगितले असता, त्याचा राग येऊन आरोपी अल्लाउद्दीन याने आई रुक्साना यांचे नाक-तोंड दाबून गळा आवळून जीवे ठार केले. त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने तोंड ओढणीने तर हातपाय दोरीने बांधून ब्लँकेटमध्ये मृतदेह गुंडाळला होता. याप्रकरणी इंदिरानगर पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. (latest marathi news)
तत्कालीन सहायक निरीक्षक एन.एन. मोहिते यांनी तपास करीत दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले. जिल्हा सत्र न्यायधीश श्रीमती आर. एन. शिंदे यांच्यासमोर खटल्याचे काम चालले. सरकार पक्षातर्फे सहायक अभियोक्त श्रीमती अपर्णा पाटील, सहायक अभियोक्ता श्रीमती रेवती कोतवाल यांनी कामकाज पाहत साक्षीदार तपासले. आरोपीविरोधातील पुरावे सिदध झाल्याने न्यायालयाने आरोपीला जन्मठेप व हजारांचा दंड ठोठावण्यात आला. पैरवी अधिकारी म्हणून हवालदार सुधाकर गावकवाड, रशिद शेख यांनी पाठपुरावा केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.