Nashik Crime : डॉ. सुभाष भामरेंविरुद्ध मालेगावी झळकले फ्लेक्स! विनापरवानगी असल्याने पोलिसांत गुन्हा दाखल

Crime News : पोलिसांनी या प्रकरणी आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली.
Text on the flex displayed in Mosam Pool Chowk against MP Dr. Subhash Bhamre.
Text on the flex displayed in Mosam Pool Chowk against MP Dr. Subhash Bhamre.esakal

मालेगाव : धुळे लोकसभा मतदारसंघतून उमेदवारी जाहीर झालेले भारतीय जनता पक्षाचे विद्यमान खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्या उमेदवारीला विरोध करणारे फलक येथील मोसम पूल भागात आज झळकल्याने खळबळ उडाली. महापालिकेने या फलकाची सत्यता तपासली असता तो विनापरवानगी लावण्यात आल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर तो उतरविण्यात आला, तसेच पोलिसांनी या प्रकरणी आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली. (Nashik Crime malegaon flex against MP Dr Subhash Bhamre marathi news)

येथील मोसम पूल चौकातील या. ना. जाधव विद्यालयाजवळ हा फलक लावण्यात आलेला होता. गुरुवारी (ता. २१) मध्यरात्री तो लावल्याचा संशय आहे. सकाळी चौकातून जाणाऱ्या काहींच्या हा प्रकार लक्षात आला अन त्याची वार्ता शहरभर पसरली. महापालिका प्रभाग कार्यालयात ही माहिती समजताच हा फलक विनापरवानगी व महापालिकेच्या अधिकृत जाहिरात एजन्सीतर्फे लावलेला नसल्याचे निदर्शनास आले.

वेट ॲन्ड जॉय वॉटरपार्कच्या जाहिरात फलकावरच हा फलक लावलेला होता. ही माहिती मिळताच महापालिका प्रशासनाने सकाळी पावणेदहाच्या सुमारास हा फलक उतरविला. पक्षाचे पदाधिकारी, नेते, कार्यकर्ते चिंतेत आहेत. नेमका हा फलक कोणी लावला, याविषयी वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत.  (latest marathi news)

Text on the flex displayed in Mosam Pool Chowk against MP Dr. Subhash Bhamre.
Dhule Cime: दोंडाईचात चोरट्यांचा प्रयत्न फसला! चोरट्याने तिसऱ्या मजल्यावरून टाकली उडी पण...

या फलकामुळे आचारसंहितेचा भंगही झाला आहे. महापालिका आयुक्तांच्या परवानगीनंतर प्रभाग क्रमांक एकचे प्रभाग अधिकारी सचिन भामरे यांच्या सूचनेनुसार बीट मुकादम दिलीप निकम हे सायंकाळी छावणी पोलिस ठाण्यात विनापरवानगी फलक व आचारसंहिता भंगाचा गुन्ह्यासंदर्भात तक्रार देण्यासाठी ठाण मांडून होते. रात्री उशिरापर्यंत पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

Text on the flex displayed in Mosam Pool Chowk against MP Dr. Subhash Bhamre.
Nagpur Cime News: 'नासा'मध्ये नोकरीचं आमिष दाखवून 111 जणांची फसवणूक, आरोपीला अटक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com