Nashik Crime News : नववर्षातही घरफोड्यांचे सत्र कायम; 10 दिवसांत 14 घटनांनी शहरवासीय हादरले

robbery
robberyesakal

नाशिक : शहरातील घरफोड्यांचे सत्र नववर्षातही कायम असून, गेल्या दहा दिवसांमध्ये १४ घरफोड्या झाल्या आहेत. चोरट्यांनी तब्बल सुमारे १७ लाख ४७ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे.

तर, सोमवारी (ता. ९) तीन घरफोड्यांचे गुन्हे दाखल झाले असून, यात आडगावात दोन लाख तर अंबडला तीन लाखांची घरफोडी झाली आहे. घरफोडीच्या सत्रांना रोखण्यात शहर पोलिस अपयशी ठरल्याचेच चित्र असून, नागरिकांमध्ये मात्र भितीचे वातावरण आहे.

robbery
Nashik Crime News : KYC अपडेटसाठी घेतलेल्या कागदपत्राद्वारे दुकानदारांची फसवणूक

आडगाव येथील चौंडेश्वरी नगर परिसरात चोरट्याने घरफोडी करून सुमारे सव्वादोन लाखांचा ऐवज लंपास केला आहे. पोपट लोटन महिरे यांच्या फिर्यादीनुसार, चोरट्याने ३ जानेवारीच्या मध्यरात्री बंद घराचे फोडून दोन लाख १२ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल झाला आहे.

तर दुसरी घरफोडी इंदिरानगर परिसरातील बजरंग सोसायटीत झाली. प्रांजल रूपचंद चौधरी यांच्या फिर्यादीनुसार, ७ ते ९ जानेवारी दरम्यान चोरट्याने बंद घराचे लॅच लॉक उचकटून आत प्रवेश केला आणि एक लाख २५ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तिसरी घरफोडी अंबडमध्ये घडली. प्रशांत नारायण कान्हे (रा. सोहम हाईटस्‌, पडोळ मळा, अंबड) यांच्या फिर्यादीनुसार, सोमवारी (ता. ९) सायंकाळी अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद फ्लॅटचा कोयंडा तोडला आणि घरातून ३ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. याप्रकरणी अंबड पोलिसात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा: या महामार्गामुळं खरंच येईल 'समृद्धी'?

गस्ती, नाकाबंदी फेल

शहरात दिवसा पोलिसांची पथके गस्तीवर असतात. तर रात्रीही गस्तीसह अनेक ठिकाणी नाकाबंदी केली जाते. परंतु, असे असतानाही दिवसा व रात्रीही घरफोड्या होत आहेत. त्यामुळे पोलिसांच्या गस्ती पथके व नाकाबंदी फेल ठरल्याचेच स्पष्ट होत आहे. दुसरीकडे नागरिकांमध्येही पोलिसांच्या अकार्यक्षमतेवर नाराजी आहे. चोऱ्या-घरफोड्यांचे सत्र रोखण्यासाठी पोलिसांनी चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी त्रस्त नागरिकांकडून होते आहे.

robbery
Nashik Crime News : सिडकोत गावगुंडांचा 2 तरुणांवर हल्ला; पोलिसांचा वचकच शिल्लक नाही!

दहा दिवसांतील घरफोड्या

तारीख........... पोलिस ठाणे............. घरफोडीतील ऐवज

३१ डिसेंबर २२ इंदिरानगर ३५,६०० रु.

मुंबई नाका १,१७,००० रु.

१ जानेवारी २३ मुंबई नाका ३,३४,००० रु.

२ जानेवारी गंगापूर ९६,२०० रु.

भद्रकाली ७५,००० रु.

३ जानेवारी आडगाव ६३,१०० रु

robbery
Nashik Crime News : जिल्ह्यातील नववर्षातील सर्वात मोठी कारवाई; 41 जनावरांची सुटका

४ जानेवारी आडगाव ३,२९,००० रु

म्हसरुळ ४५,००० रु

गंगापूर २,३५,००० रु

७ जानेवारी गंगापूर २०,००० रु

सातपूर ३०,००० रु

९ जानेवारी आडगाव २,१२,५०० रु

इंदिरानगर १,२५,५०० रु.

अंबड ३,००,००० रु

एकूण ....................................१७,४७,९०० रु.

robbery
Nashik Crime News : दुचाकी चोरीचे सत्र सुरूच; पोलिसांचीच सरकारी दुचाकी पळवली!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com