Crime News
Crime Newsesakal

Nashik Crime News : शेतीच्या वादातून भावाची माजी सैनिक भावाला अन् कुटुंबाला मारहाण

देवळा : मालेगाव रस्त्यावरील लोखंडे पॅलेस येथे शेतीच्या रस्त्याच्या वादातून सख्ख्या भावाने माजी सैनिक असलेला भाऊ, भावजय व पुतणीला लोखंडी हत्यारांनी बेदम मारहाण केली असून या घटनेचा देवळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित संशयित यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

Crime News
Nashik Crime News : बंटी-बबलीची पुन्हा करामत; महिलेच्या डोळ्यादेखत लांबवले दागिने अन् रोख रक्कम

देवळा येथील मालेगाव रस्त्यावरील लोखंडे पॅलेस येथे शेतीच्या रस्त्याच्या वादातून संजय रतन लोखंडे, त्याची पत्नी मनीषा, मुलगा सागर व प्रेम यांनी माजी सैनिक असलेला भाऊ मांगू रतन लोखंडे व त्याची पत्नी कल्पना तसेच मुलगी माधुरी यांना शनिवारी ( ता.२१) कुऱ्हाड , कोयता व लोखंडी सळई अशा तीक्ष्ण धारदार बेदम मारहाण करत गंभीर जखमी केले.

हेही वाचा: प्राप्तिकर उत्पन्न सवलत मर्यादा वाढणार?

जखमींवर नाशिक येथील देवळाली मिलिटरी हॉस्पिटलमध्ये उपचार केले जात आहे. देवळा पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव येऊन मारहाण करण्याऱ्या आरोपींना ताब्यात घेत त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. या घटनेचा आजी माजी सैनिक संघटनेने या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला असून आरोपींवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी माजी सैनिक संघटनेचे जनसंपर्क अध्यक्ष प्रवीण बोरसे यांनी केली आहे.

Crime News
Nashik Crime News : कुत्रा भुंकला म्हणून फोडल्या गाड्या अन् पोलीसांनी झिंगाट संशयिताला ठोकल्या बेड्या!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com