Nashik Crime: धक्कादायक! बहिणीला त्रास देणाऱ्या तरूणाची भावाने केली हत्या

एकतर्फी प्रेमातून तरूणाची हत्या
Nashik Crime
Nashik Crimeesakal

नाशिकमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नाशिक शहरातील निलगिरी बाग परिसरात एकतर्फी प्रेमातून बहिणीला त्रास देऊन लग्नासाठी तगादा लावत असल्याच्या रागातून मुलीच्या भावाने 25 वर्षीय तरुणाची हत्या केली आहे.

Nashik Crime
MPSC New Syllabus : असा असणार MPSC चा नवा पॅटर्न ! २०२५ साली होणार लागू

या घटनेमुळे नाशिक हदरलं आहे. हत्या करण्यात आलेल्या तरूणाचे नाव विकास नलावडे आहे. या तरूणावर धारदार शस्त्राने वार करत त्याची हत्या करण्यात आली आहे.

मृत विकास राहत असलेल्या अपार्टमेंटमध्येच राहणाऱ्या एका तरुणीवर त्याचे एकतर्फी प्रेम जडले. विकास वारंवार त्या मुलीचा पाठलाग करायचा आणि लग्न करण्याची मागणी करायचा. मात्र मुलगी त्याचा विरोध करत होती. तरी देखील विकास ऐकत नव्हता.

Nashik Crime
MPSC New Syllabus : आदित्य-पवार भेटीपूर्वीचं MPSC चा निर्णय? CM एकनाथ शिंदे स्पष्टच बोलले...

शेवटी राग मनात धरून राहत्या अपार्टमेंटच्या समोर असलेल्या मोकळ्या मैदानात बुधवारी रात्री दहाच्या सुमारास मुलीचा आरोपी भाऊ अमोल साळवे, जावई राहुल उजगीरे आणि मामा सुनील मोरे यांनी विकासला मारहाण केली.

तसेच त्याच्यावर धारधार शस्त्राने वार करत त्याची हत्या केली.या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने आरोपींना अटक केली आहे. तर आरोपी राहुल उजगिरे हा जखमी असल्याने त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com