Nashik Crime News : धारदार हत्याराने मारून एकाचा खून! गंगाघाट वरील घटना

Nashik News : धक्का लागण्यावरून झालेल्या वादाची कुरापत काढून टोळक्याने एकावर हल्ला केला. यात संशयिताने धारदार हत्याराने मारून एकाचा खून केल्याची घटना घडली.
Crime
Crime esakal

Nashik News : धक्का लागण्यावरून झालेल्या वादाची कुरापत काढून टोळक्याने एकावर हल्ला केला. यात संशयिताने धारदार हत्याराने मारून एकाचा खून केल्याची घटना घडली. मंगळवारी (ता 30) रात्री सदरची घटना घडली असून मयत मनपातील अतिक्रमण विभागातील कर्मचारी आहे. (Nashik Crime One killed by sharp weapon)

सनी जॉन मायकल असे मयत युवकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सनि गंगाघटवरून जात असताना एकाला धक्का लागला. त्यावरून वाद झाला. त्यानंतर त्यांची भेट पून्हा एका पान टपरीवर झाली असता पुन्हा वाद होऊन झटापट झाली.

मंगळवारी रात्री सनी त्याच्या मित्रांसोबत गोदाघाटवर पार्टी करीत असताना ७ ते ८ संशयितांचे टोळके आले आणि त्यांनी मारहाण सुरू केली. (latest marathi news)

Crime
Crime News : गांजा बाळगणारी महिला अटकेनंतर पोलीस ठाण्यातून पळाली

यावेळी एका संशयिताने त्याच्याकडील धारदार हत्याराने सनीवर वार केले. यात तो गंभीररित्या जखमी झाला. उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता त्यास मयत घोषित करण्यात आले. या प्रकरणी सरकारवाडा पोलिसात अज्ञात संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Crime
Wagholi Crime : वाघोलीत १७ वर्षीय मुलीवर दोघांचा लैंगिक अत्याचार; आईसह तिघांवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com