
नाशिक : चोरीच्या नळांचे वॉल भंगारात खरेदी करणाऱ्या व्यावसायिकाला गुन्ह्यात सुटका करण्यासाठी लाच मागणाऱ्या सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकाची घरझडती घेण्यात आली. यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाच्या हाती काहीही लागू शकलेले नाही. या प्रकरणी अंबड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजेंद्र सोपान घुमरे (वय ५६, रा. गणेशनगर, द्वारका) असे लाचखोर सहायक उपनिरीक्षकाचे नाव आहे.