

नाशिक : आंतरजातीय विवाह केलेल्या आणि गर्भवती असलेल्या मुलीला गळा आवळून मारल्याप्रकरणी नराधम बाप एकनाथ किसन कुंभारकर याला सर्वोच्च न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. जून २०१३ मध्ये घडलेल्या या घटनेप्रकरणी नाशिक जिल्हा न्यायालयाने दिलेली फाशीची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाने कायम ठेवली होती. ‘सकाळ’ने पाठपुरावा केलेल्या या प्रकरणात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून जातपंचायतीच्या अनिष्ट प्रथांविरोधात लोकचळवळ उभी राहिली. (Supreme Court sentenced Kumbharkar to 20 years rigorous imprisonment in honor killing case )