Nashik Crime : बँकेचे ATM फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना अटक; विधीसंघर्षित बालकासह मुख्य संशयित फरार

Crime News : या गुन्ह्यात वापरण्यात आलेली कारदेखील एका कंपनीच्या सुरक्षारक्षकाला धमकावून चोरण्यात आली होती.
Police team with two suspects trying to break into an ATM
Police team with two suspects trying to break into an ATMesakal

वावी : सिन्नर तालुक्यातील मुसळगाव येथील सहकारी औद्योगिक वसाहत परिसरात सुरक्षारक्षकाला कोयत्याचा धाक दाखवून त्याला दाबून ठेवत सारस्वत बँकेचे एटीएम फोडून त्यातील 17 लाख रुपये रक्कम लुटण्याचा प्रयत्न 13 मार्च रोजी पहाटेच्या सुमारास झाला होता.

या गुन्ह्यात वापरण्यात आलेली कारदेखील एका कंपनीच्या सुरक्षारक्षकाला धमकावून चोरण्यात आली होती. या दोन्ही गुन्ह्यांचा स्थानिक गुन्हे शाखा व एमआयडीसी पोलिसांनी संयुक्तपणे तपास करत दोघांच्या मूसक्या आवळल्या आहेत. एका विधीसंघर्षित बालकासह या गुन्ह्यातील मुख्य संशयित फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. (Nashik Crime Two arrested for trying to break bank ATM main suspect absconding at sinnar marathi new)

मुसळगाव वसाहती मधील रॅक्यु रेमेडीज या औषध निर्मिती करणाऱ्या कारखान्याच्या सुरक्षारक्षकाला 13 मार्च च्या पहाटे चौघा जणांनी चाकू व कोयत्याचा धाक दाखवून मारहाण करून तसेच कारखान्याच्या ऑफिस मधील सीसीटीव्ही कॅमेराचे डीव्हीआर मॉनिटर वस्तू लिफ्ट करण्यासाठी लागणारा बेल्ट आधी साहित्य लांबवले होते.

सुरक्षारक्षकाला बांधून ठेवत कारखान्याच्या आवारात उभी असलेली महिंद्रा व्हेरिटो कार ( MH-15-EP-6567) या संशयतांनी पळवली होती. त्याच दिवशी पहाटे संशयी त्यांनी या कारमधून येत सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँकेचे एटीएम लुटण्याचा प्रयत्न केला होता. तेथील सुरक्षा रक्षकाला देखील कोयत्याचा धाक दाखवून एटीएम रूममध्ये कोंडले होते.

चौघांनी मिळून हे मशीन रूमच्या बाहेर घेत ते फोडण्याचा प्रयत्न केला मात्र हा प्रयत्न यशस्वी ठरला या एटीएम मध्ये सुमारे 14 लाख रुपये रोख रक्कम होती. ही रक्कम लुटण्याचा प्रयत्न फसल्यावर चौघेजण कारमधून पळून गेले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी गुन्ह्यात वापरलेली कार बेवारस सोडून दिल्याचे आढळून आले होते.

याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर व निफाड उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व एमआयडीसी पोलीस ठाण्यामार्फत संयुक्त तपास करण्यात येत होता.

सदर गुन्ह्यातील आरोपींची गुन्हा करण्याची पध्दत, गुन्हयातील साक्षीदारांनी आरोपींचे सांगितलेले वर्णन व त्यांची बोलीभाषा यावरून गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार विनोद टिळे यांनी गोपनीय माहिती काढून सदरचे गुन्हे हे सराईत गुन्हेगार प्रविण उर्फ भैय्या गोरक्षनाथ कांदळकर, रा. शहा याने त्याचे साथीदारांसह मिळून केले असल्याचे निष्पन्न केले होते.  (latest marathi news)

Police team with two suspects trying to break into an ATM
Nashik Cyber Crime : भाजपच्या नावे बनावट फेसबुक अकाऊंट! शहर सायबर पोलिसात गुन्हा दाखल

गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यशवंत बाविस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली संयुक्त पथकाने मुसळगाव औद्योगिक वसाहत परिसरातून गोरख लक्ष्मण सोनवणे (२८) रा. मुसळगाव, सुदर्शन शिवाजी ढोकणे (२८) रा. कुसमाडी, ता. येवला यांना ताब्यात घेतले.

त्यांना बोलते केल्यावर शहा ता. सिन्नर येथील सराईत गुन्हेगार भैय्या उर्फ प्रवीण कांदळकर यांचे सह एका विधीसंसर्गित बालकासमवेत सुरक्षारक्षकांना मारहाण करून चोरणे व एटीएम फोडण्याचा प्रयत्न करणे या गुन्ह्यांची कबुली मिळाली. गुन्ह्यात वापरलेला लोखंडी कोयता, मोबाईल फोन त्यांच्याकडून जप्त करण्यात आले.

गुन्हे शाखेचे अंमलदार गिरीष बागुल, हेमंत गरूड, प्रदिप बहिरम, हेमंत गिलबिले, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक भगवान शिंदे, योगेश शिंदे, नवनाथ चकोर, प्रकाश उंबरकर, विक्रम टिळे, प्रशांत सहाणे यांनी या कारवाईत सहभाग घेतला.

कार चोरी व एटीएम फोडण्याचा प्रयत्न या गुन्ह्यांमध्ये मुख्य संशयित असलेला भैया उर्फ प्रवीण कांदळकर यांच्या शोधासाठी गुन्हे शाखेसह सिन्नर तालुक्यातील तीनही पोलीस ठाण्यांमार्फत तपास मोहीम राबविण्यात येत आहे. सराईत गुन्हेगार असलेला भैय्या कांदळकर याचे विरुद्ध यापूर्वी अनेक दखलपात्र गुन्ह्यांची नोंद आहे. गेल्या वर्षी त्याचे विरुद्ध तडीपारीची कारवाई देखील वावी पोलीस ठाणे मार्फत करण्यात आली होती.

Police team with two suspects trying to break into an ATM
Dhule Crime News : दुचाकी चोरणारी टोळी जेरबंद; सोनपोतीसह 7 वाहने हस्तगत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com