Nashik Crime News : बॅग लिफ्टिंग गुन्ह्यातील दोघांना अटक; संशयितांकडून स्वीफ्ट कार जप्त

Nashik Crime : गेल्या आठवड्यात आरटीओ ऑफिसजवळ दुकानातील १७ लाखांची रोकड लूट प्रकरणातील फरारी दोन संशयितांना जेल रोड परिसरातून अटक करण्यात आली आहे.
Swift car seized from two suspects in case of bag lifting  team of Unit One of Neighbor City Crime Branch
Swift car seized from two suspects in case of bag lifting team of Unit One of Neighbor City Crime Branchesakal

Nashik Crime News : गेल्या आठवड्यात आरटीओ ऑफिसजवळ दुकानातील १७ लाखांची रोकड लूट प्रकरणातील फरारी दोन संशयितांना जेल रोड परिसरातून अटक करण्यात आली आहे. शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने यापूर्वीच याप्रकरणी तिघांना अटक केलेली आहे. सागर सुधाकर पगारे (रा. साईस्नेह अपार्टमेंट, समर्थनगर, पंचवटी), वैभव ऊर्फ मऊ संजय गांगुर्डे (रा. बजरंग अपार्टमेंट, कर्णनगर, पंचवटी) असे अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. (Nashik Crime Two arrested in bag lifting crime with car )

व्यापारी पवन लोढा यांच्या दुकानातील कामगार दिलीप छाजेड १७ तारखेला १७ लाखांची रोकड घेऊन लोढा यांच्या घरी जात असताना त्यांना संशयितांनी अडविले आणि रक्कम हिसकावून नेली होती. या गुन्ह्याची शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने उकल केली आणि ४८ तासांत तिघांना अटक केली होती, तर दोघे फरारी होते. पथक त्यांचा शोध घेत होते.
युनिट एकचे अंमलदार अमोल कोष्टी, जगेश्वर बोरसे यांना पगारे व गांगुर्डे हे दोघे संशयित जेल रोड परिसरामध्ये एका स्वीफ्ट कारमधून फिरत असल्याची खबर मिळाली होती.

Swift car seized from two suspects in case of bag lifting  team of Unit One of Neighbor City Crime Branch
Nashik Crime News: शहरात अवैधरीत्या मद्यविक्रेत्‍यांचा सुळसुळाट! पोलिसांच्‍या कारवाईत विविध पोलिस ठाण्यात गुन्‍हे दाखल

त्यानुसार युनिट एकच्या पथकाने जेल रोड परिसरामध्ये सापळा रचून दोघांना शिताफीने अटक केली. त्यांच्याकडील चार लाख ४५ हजार रुपयांची स्वीफ्ट कार (एमएच १५, ईबी ४१२९) व साडेचार हजार रोख असा मुद्देमाल जप्त केला आहे. दोन्ही संशयितांना पुढील तपासासाठी म्हसरूळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. संबंधित कामगिरी वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक हेमंत तोडकर, उपनिरीक्षक गजानन इंगळे, रवींद्र बागूल, जगेश्वर बोरसे, अमोल कोष्टी, समाधान पवार यांच्या पथकाने बजावली.

अटक असलेले संशयित

संदेश सुधाकर पगारे ऊर्फ काळ्या, सागर सुधाकर पगारे, वैभव ऊर्फ मऊ गांगुर्डे, अस्लम सय्यद, अतुल सय्यद अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.

Swift car seized from two suspects in case of bag lifting  team of Unit One of Neighbor City Crime Branch
Nashik Fraud Crime News : अशोक कटारिया ‘अटकपूर्व’साठी न्यायालयात; रविवारीही ‘अंशुमान’वर झडतीसत्र

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com