Nashik Fraud Crime News : अशोक कटारिया ‘अटकपूर्व’साठी न्यायालयात; रविवारीही ‘अंशुमान’वर झडतीसत्र

Nashik Fraud Crime : दाखल फसवणुकीच्या गुन्ह्यात रविवारी (ता. २१) पुन्हा अशोक कटारिया यांच्या ‘अंशुमान’ बंगल्यात पोलिसांनी झडतीसत्र राबविले.
Anshuman House
Anshuman Houseesakal

Nashik Fraud Crime News : उपनगर पोलिस ठाण्यात दाखल एमपीआयडीअंतर्गत (महाराष्ट्र ठेवीदार हितसंरक्षण कायदा) दाखल फसवणुकीच्या गुन्ह्यात रविवारी (ता. २१) पुन्हा अशोक कटारिया यांच्या ‘अंशुमान’ बंगल्यात पोलिसांनी झडतीसत्र राबविले. दरम्यान, कटारिया यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर जिल्हा व सत्र न्यायालयात येत्या २९ तारखेला सुनावणी होणार आहे. तर, नरेश कारडा यांनीही मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. (Nashik Fraud Crime Ashok Kataria in court for pre arrest marathi News )

गुंतवणूकदारांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी नरेश कारडा, अशोक कटारिया, सतीश पारख, मनोहर कारडा, अनुप कटारिया यांच्यासह संचालक संशयितांविरोधात उपनगर पोलिसांत गुन्हे दाखल आहेत. यात दोन गुन्हे एमपीआयडीअंतर्गत दाखल आहेत. संशयितांनी गुंतवणूकदारांची सुमारे १७ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे उघड झाले असून, फसवणुकीचा आकडा वाढत आहे. गुन्हे दाखल झाल्यापासून संशयित फरारी आहेत.

दरम्यान, उपनगर पोलिसांनी शनिवारी (ता. २०) रात्री बांधकाम व्यावसायिक अशोक कटारिया, सतीश पारख यांच्या घर व कार्यालयाची झडती घेतली. यात फसवणुकीच्या गुन्ह्याशी संबंधित कागदपत्रांचा पोलिस शोध घेत आहेत. रविवारी (ता. २१) सकाळी पुन्हा उपनगर पोलिसांच्या तपासी पथकाने कटारिया यांच्या बंगल्यात झडतीसत्र राबविले. यात पोलिसांनी गुन्ह्याशी संबंधित कागदपत्रांचा शोध घेत ते ताब्यात घेतले.

Anshuman House
Nashik Fraud Crime : संशयित राठींच्या बँक व्यवहारांचा तपास सुरू; 28 कोटींचे फसवणूक प्रकरण

हाती लागलेल्या कागदपत्रांचीही पोलिसांकडून कसून तपास केला जात आहे. यापूर्वी कारडा, सतीश पारख, कटारिया यांच्या कार्यालय व घरातून महत्त्वाची कागदपत्रे, आर्थिक व्यवहारांचे दस्त पोलिसांनी जप्त केलेले आहेत. मात्र, पोलिसांनी चौकशीला बोलावून संशयितांपैकी कोणीही हजर होत नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

संशयित न्यायालयात

नरेश कारडा यांचा अटकपूर्व जामीन अर्ज गेल्याच आठवड्यात जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळून लावला आहे. त्यामुळे त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. तर, अशोक कटारिया यांनीही अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा व सत्र न्यायालयात धाव घेतली असून, त्यावर येत्या २९ तारखेला सुनावणी होणार आहे. उर्वरित संशयितांकडूनही अटकपूर्वसाठी प्रयत्न केले जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Anshuman House
Nashik Fraud Crime : स्‍वस्‍तात फ्लॅट खरेदीचे आमिष पडले महागात! दोघांनी मिळून घातला 9 लाखांचा गंडा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com