Bike Theft
Bike Theftesakal

Nashik Bike Theft : पार्टन्‌पार्ट काढून दुचाकी बेवारस दिली सोडून; शहरात दुचाकी चोरीचे सत्र कायम

Nashik News : एका चोरट्याने तर दुचाकी चोरून नेली आणि दुचाकीचे पार्ट न्‌ पार्ट काढून घेत दुचाकी लोणी (जि. अहमदनगर) येथे बेवारस सोडून पसार झाला आहे.

Nashik News : शहर परिसरातून दुचाक्या चोरीला आळा घालण्यात पोलिसांना अपयश आलेले असताना, एका चोरट्याने तर दुचाकी चोरून नेली आणि दुचाकीचे पार्ट न्‌ पार्ट काढून घेत दुचाकी लोणी (जि. अहमदनगर) येथे बेवारस सोडून पसार झाला आहे. दुचाकी चोरीचा हा प्रकार पाहून पोलीसही अवाक्‌ झाले आहेत. दरम्यान, शहराच्या उपनगरीय परिसरातून पुन्हा सहा दुचाक्या चोरीला गेल्या असून, पोलिसांची नाकाबंदी नावापुरतीच असल्याचे बोलले जात आहे. (Nashik Bike Theft)

आदित्य पोपट जाधव (रा. मानस सोसायटी, गीतानगर, दिंडोरी रोड, म्हसरुळ) या युवकाच्या फिर्यादीनुसार, तो नातेवाईकाकडे गेलेला असताना, शनिवारी (ता. ११) रात्री साडेसात ते बाराच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने त्याची यामाहा दुचाकी (एमएच १५ एचएस ४८०८) चोरून नेली. या दुचाकीचे फायबरच्या फेअरिंगस्‌, हेडलाईट, टेल लाईट, इंडिकेटर, डीआरएल लाईट, मडगार्ड, पेट्रोल टॅन्क, बॅटरी, मागचे-पुढचे सीट.

साईड कव्हर, दोन्ही मिरर्स, वायरिंग कीट, ॲन्टी ब्रेक युनिट, ब्रेक पॅड, प्रोग्रॅमींग चीप, हॅन्डल लॉक स्वीच, रेडिएटर, विंडशिल्ड, साईड गार्ड असा सुमारे २४ हजारांचे पार्ट काढून घेतले आणि दुचाकी लोणी (जि. अहमदनगर) येथे बेवारस स्थितीमध्ये लावून दिली होती. याप्रकरणी म्हसरूळ पोलिसात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संतोष किसन इंगोले (रा. दत्तनगर, अंबड) यांची ३० हजारांची दुचाकी (एमएच १५ सीएफ ५४०६) ७ मे रोजी सायंकाळी पाच वाजता दिंडोरी रोडवरील बैलबाजाराच्या पाठीमागील मोकळ्या परिसरातून अज्ञात चोरट्याने चोरून नेली. याप्रकरणी पंचवटी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमित प्रकाश बागुल (रा. लक्ष्मीनारायण अपार्टमेंट, रविवार कारंजा) यांची ५० हजारांची ॲक्टिवा मोपेड (एमएच १५ एफआर ४४३३) ८ तारखेला मध्यरात्री राहत्या इमारतीमधून अज्ञात चोरट्याने चोरून नेली. (latest marathi news)

Bike Theft
Nashik Lok Sabha Election : मतदान केंद्रावर सेक्टर अधिकार्यांचा असेल ‘वॉच’; शहर विशेष शाखेचे नियोजन

याप्रकरणी सरकारवाडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिनेश कौतिक सोनवणे (रा. द इम्पीयर अपार्टमेंट, शिवाजीनगर) याची १५ हजारांची दुचाकी (एमएच १८ एएच ८४३२) शनिवारी (ता. ११) राहत्या इमारतीच्या पार्किंगमधून दुपारी चारच्या सुमारास अज्ञात चोरट्याने चोरून नेली.

याप्रकरणी गंगापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिलीप भरत चव्हाण (रा. सप्तशृंगी प्राईड, पाथर्डी शिवार) यांची ३० हजारांची दुचाकी (एमएच १५ जीजे ९९२४) २२ एप्रिल रोजी रात्री नऊच्या सुमारास संभाजी स्टेडिअम येथून अज्ञात चोरट्याने चोरून नेली. याप्रकरणी अंबड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुनील राजेंद्र सुरसे (रा. श्री अपार्टमेंट, सावरकरनगर, अशोकनगर, सातपूर) यांची ३५ हजारांची दुचाकी (एमएच १५ जेजी ७४६४) शनिवारी (ता. ११) मध्यरात्री राहत्या इमारतीच्या पार्किंगमधून अज्ञात चोरट्याने चोरून नेली. याप्रकरणी सातूपर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Bike Theft
Nashik PM Narendra Modi : शहर-जिल्ह्यात प्रतिबंधात्मक नोटीसा बजावण्याची शक्यता; मोदींच्या सभेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून सतर्कता

नाकाबंदी असतानाही...

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात कडेकोट नाकाबंदीचे नियोजन करण्यात आलेले आहे. असे असतानाही चोरटे दुचाक्या लंपास करण्यात यशस्वी होत आहेत. त्यामुळे नाकाबंदीतील फोलपणाचा उघडकीस आला आहे.

पोलिसांच्या या निष्काळजीपणाचा वाहनचालकांना मात्र मनस्तापाला सामोरे जावे लागते आहे. राहत्या घराच्या पार्किंग असो वा सार्वजनिक पार्किंग, याठिकाणी पार्क केलेली दुचाकी सुरक्षित राहील याची कोणतीही शाश्वती वाहनचालकांना राहिलेली नाही.

Bike Theft
Nashik News : ड्रग्जप्रकरणातही वैभवची झाली होती चौकशी; कुस्तीपटू लहामगे खून प्रकरण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com