Nashik Crime News : वणीच्या व्यापाऱ्याचे अपहरण करून लुटले; म्हसरुळ हद्दीत अज्ञात अपहरणकर्त्यांचा कारनामा

Nashik Crime : नाशिकमध्ये माल खरेदीसाठी येणार्या वणीच्या व्यापाऱ्यास कारमधून आलेल्या अज्ञात चौघा संशयितांनी दिंडोरी रोडवरील केंब्रिज शाळेजवळून अपहरण केले.
Crime
Crime esakal

नाशिक : नाशिकमध्ये माल खरेदीसाठी येणार्या वणीच्या व्यापाऱ्यास कारमधून आलेल्या अज्ञात चौघा संशयितांनी दिंडोरी रोडवरील केंब्रिज शाळेजवळून अपहरण केले. म्हसरूळ-आडगाव लिंक रोडदरम्यान संशयितांनी व्यापाऱ्यास मारहाण करून त्यांच्या अंगावरील दागिने व रोकड असा सुमारे दीड लाखांचा ऐवज लुटून निर्जनस्थळी सोडून देत पोबारा केल्याची घटना घडल्याने एकच खळबळ उडाळी आहे. गेल्या बुधवारी (ता. ५) घडलेल्या या घटनेप्रकरणी शनिवारी गुन्हा दाखल झाला असून, पोलिसांनी अपहरणकर्त्यांचा शोध घेण्यासाठी कसून तपास सुरू केला आहे. (Vani merchant was kidnapped and robbed by thief )

अमित रवींद्र कुलकर्णी (३६, रा. बाजारपेठ गल्ली, वणी, ता. दिंडोरी) यांच्या फिर्यादीनुसार, त्यांचे बाजार पेठ गल्लीत किराणा दुकान आहे. बुधवारी (ता. ५) सायंकाळी पाचच्या सुमारास ते त्यांच्या डिओ मोपेडवरून (एमएच १५ एचजे ८२३६) नाशिकमध्ये किराणा माल खरेदीसाठी निघाले. रात्री पावणे आठ वाजेच्या सुमारास ते म्हसरुळ हद्दीतील केंब्रिज शाळेजवळ रस्त्यालगत लघुशंकेसाठी थांबले असता, पाठीमागून कारमधून तोंडावर रुमाल बांधलेले चौघे जण आले आणि त्यांनी कुरापत काढून कुलकर्णी यांना अडविले.

त्यावेळी एकाने पाठीमागून लोखंडी पाईपाने जोरदार प्रहार केल्याने ते बेशुद्ध झाले. संशयितांनी कुलकर्णी यांना बळजबरीने कारमध्ये बसविले. कारमध्येही संशयितांनी बेदम मारहाण करीत, त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने व खिशातील रोकड असा १ लाख ४५ हजारांचा ऐवज काढून घेतला. म्हसरुळ-आडगाव लिकंरोडवरील निर्जनस्थळी कार थांबविली आणि कुलकर्णी यांना त्याठिकाणी सोडून देत त्यांच्या मोपेडची चावी त्यांच्य अंगावर फेकून देत पोबारा केला.

Crime
Nashik Crime : जिल्हा न्यायाधीशांच्या शेतातून 20 वर्षांचे चंदनाचे झाड चोरीला! सिन्नर तालुक्यातील सांगवी येथील घटना

दोन दिवसांनी फिर्याद...

दरम्यान, सदरील अपहरण व लुटमारीची घटना बुधवारी (ता.५) सायंकाळी घडलेली असताना कुलकर्णी यांनी शनिवारी (ता. ८) म्हसरुळ पोलिस ठाणे गाठून फिर्याद दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, गुन्ह्यांचे गांभीर्य ओळखून म्हसरुळ पोलिसांनी तपास सुरू केला आहे. घटना घडलेल्या परिसरापासून तांत्रिक तपासान्वये माहिती संकलित केली जात आहे.

अद्यापपर्यंत संशयितांची ओळख पटलेली नसून, कुलकर्णी यांनीही दोन दिवसांनी तक्रार का केली, याचीही चौकशी पोलिसांकडून केली जात आहे. मात्र, सर्व शक्यता पडताळून संशयिताचा शोध सुरू असल्याचे म्हसरुळचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुभाष ढवळे यांनी सांगितले. गुन्ह्याचा तपास उपनिरीक्षक पटारे हे करीत आहेत.

Crime
Nashik Crime News : अल्‍पवयीन मुलीसह, महिलेचा विनयभंग

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com