

Nashik News : दिंडोरी रोडवरील गुलमोहोर नगरमध्ये ८० वर्षीय वृद्धेचा खून होऊन आठवड्याचा कालावधी उलटला आहे. अद्याप संशयित युवक पोलिसांच्या हाती लागू शकलेला नाही. शहर गुन्हेशाखेची दोन पथके त्याच्या मागावर आहेत, मात्र तरीही तो पोलिसांना हुलकावणी देत पसार होण्यात यशस्वी होतो आहे. (Nashik Crime News)
कुसुम सुरेश एकबोटे (८०, राधानंद निवास, गुलमोहर नगर, दिंडोरी रोड) यांचा गेल्या १० तारखेला सकाळी संशयित युवकाने विळ्याने डोके आणि गळ्यावर मारून निर्घृण खून केला. त्यानंतर तो आणि त्याची आई पसार झाले आहेत. याप्रकरणी म्हसरुळ पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संशयित युवक हा मयत एकबोटे यांच्याच शेजारी राहत होता. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फूटेज, घरातील काही पुरावे व आजूबाजूच्या नागरिकांकडे तपास करून महत्त्वाचे पुरावे संकलित केले आहेत. श्वानपथकानेही संशयिताचा माग त्याच्या घरापर्यंत काढला होता. त्यानंतर पोलिसांची पथके संशयिताच्या मागावर होती. (latest marathi news)
मात्र, खुनाच्या घटनेला आठवडा उलटूनही संशयित अद्यापही मोकाट आहे. संशयित युवक त्याच्या आईसमवेत आदिवासी बहुल भाग असलेल्या पेठ, सुरगाणा, सापुतारा या परिसरात लपून छपून वावरतो आहे. त्याच्या मागावर शहर गुन्हेशाखेची दोन पथकेही आहेत. परंतु तो सतत ठिकाणं बदलत असल्याने पोलिसांना हुलकावणी देण्यात यशस्वी होतो आहे.
संशयित युवक सराईत गुन्हेगार असून, तो व्यसनाच्या आहारी गेलेला आहे. काही महिन्यांपूर्वीच त्या इमारतीमध्ये निवासाला आलेल्या मयत एकबोटे यांनी त्यास चांगले वागण्याचा सल्ला दिला असता, त्याचा राग मनात ठेवून त्याने सदरचे कृत्य केल्याचे समोर येते आहे. त्याच्या अटकेनंतरच निश्चित कारण समजू शकणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.