Nashik Crime : बळी मंदिराजवळ महिलेची पोत खेचली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chain-Snaching

Nashik Crime : बळी मंदिराजवळ महिलेची पोत खेचली

नाशिक : महामार्गावरील बळी मंदिराजवळ ६२ वर्षीय महिलेच्या गळ्यातील साडेचार ग्रॅम तोळ्याची सोन्याची पोत दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी बळजबरीने खेचून नेल्याची घटना भरदिवसा घडली.

हेही वाचा: Raj Thackeray: प्रबोधनकारांच्या पुण्यतिथीदिनी राज ठाकरेंची 'खास' पोस्ट; म्हणाले त्यांचा ठाकरी बाणा...

मालती यशवंत चव्हाण (रा. मित्र विहार कॉलनी, बिडी कामगार नगर, नाशिक) यांच्या फिर्यादीनुसार, त्या गेल्या शनिवारी (ता. १९) दुपारी तीन वाजेच्या सुमारास बसमधून बळी मंदिर बस थांबा येथे उतरल्या. त्यानंतर त्या घरी जाण्यासाठी रिक्षा करून जात असताना, बळीराज चायनिज दुकानासमोर काळ्या रंगाच्या स्पोर्ट बाईकवरून आलेल्या दोघांपैकी पाठीमागे बसलेल्या संशयिताने मालती चव्हाण यांच्या गळ्यातील १ लाख १५ हजार रुपयांची सोन्याची पोत खेचून अमृतधामच्या दिशेने पोबारा केला. याप्रकरणी आडगाव पोलिसात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून,उपनिरीक्षक जाधव हे तपास करीत आहेत.

हेही वाचा: Chest Pain : छातीत दुखलं म्हणजे हार्ट अटॅकचाच धोका असतो? हे वाचाच

टॅग्स :NashikCrime News