Nashik Crime : मनमाड येथे रेल्वेतून ढकलल्याने तरुणाचा मृत्यू

Nashik News : या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून याप्रकरणी सहप्रवासी याने दिलेल्या तक्रारीवरून मनमाड पोलिस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे
Death
Deathesakal

मनमाड : रेल्वे जंक्शन स्थानक प्रवासा दरम्यान मोबाईल चोरीचा आळ घेऊन २९ वर्षीय तरुणाला मारहाण करून धावत्या गाडीतून ढकलून दिल्याने तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून याप्रकरणी सहप्रवासी याने दिलेल्या तक्रारीवरून मनमाड पोलिस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Nashik Youth dies at Manmad marathi news)

कामासाठी मुंबई येथे आलेला रोहितकुमार मुकेश गोस्वामी (वय २९ रा.रामनगर गधाई, झंडा ता. नरवार जि. शिवपुरी मध्यप्रदेश) पंजाब मेलने प्रवास करीत असताना मनमाड रेल्वे स्थानकात गाडीने प्रवासी थांबा घेतल्यानंतर गाडीत २५ ते ३० वर्षीय असलेला, रंगाने निमगोरा,

अंगात हिरव्या निळ्या लाल रंगाच्या चौकटी शर्ट व निळ्या रंगाची जिन्स पॅन्ट घातलेल्या, मराठी व हिंदी भाषा बोलत असलेल्या अज्ञात तरुणाने रोहीतकुमार मुकेश गोस्वामी यास मोबाईल चोरी केल्याचा आरोप करुन लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली. (Latest Marathi News)

Death
Nashik Crime: भागवत बंधुंचे पैशांसाठी अपहरण अन्‌ सुटका! गुंतविलेल्या रकमेची केली मागणी; गुन्हा दाखल

यावेळी सहप्रवाशांनी समजविण्याचा प्रयत्न केला असता संशयित तरुणाने सहप्रवासी यांना देखील शिवीगाळ केली आणि रोहितकुमार यांच्या वडिलांना फोनवर रोहित यास रेल्वेतून खाली फेकून देण्याची धमकी दिली.

त्यानंतर मनमाड स्थानकातून पंजाब मेल भुसावळ प्रस्थान होत असताना धावत्या गाडीतून रोहितकुमार गोस्वामी याला फेकून दिल्याने त्याचा मृत्यू झाला. अजयकुमार श्यामसुंदर साहू याच्या तक्रारीवरून मनमाड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

Death
Dombivli Crime News : गुटख्याच्या कारखान्यावर कल्याण गुन्हे शाखेचा छापा ; 17 लाखाचा गुटखा व इतर साहित्य जप्त

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com