Nashik Crime News : पूर्ववैमनस्यातून ‘बकासूरा’चा खातमा! उपनगर हद्दीतील घटना; तिघांना अटक

Crime News : काही महिन्यांपूर्वीच सोशल मीडियावर ‘बकासूर’ नावाच्या हॅण्डलवरून भाईगिरीचे रिल्स केल्याप्रकरणी याच मयत युवकावर पोलिसांनी कारवाई केली होती.
Murder News
Murder Newsesakal

Nashik Crime News : गणपती विसजर्नच्या मिरवणुकीत झालेल्या वादातून संशयिताच्या टोळक्याने मंगळवारी (ता. ७) रात्री १८ वर्षीय युवकाला गाठून त्याच्यावर धारदार शस्त्राने वार करीत त्याचा निर्घृण खून केल्याची घटना घडली. याप्रकरणी उपनगर पोलिसांनी तिघांना अटक केली असून, उर्वरित संशयितांचा पोलिस शोध घेत आहेत. दरम्यान, काही महिन्यांपूर्वीच सोशल मीडियावर ‘बकासूर’ नावाच्या हॅण्डलवरून भाईगिरीचे रिल्स केल्याप्रकरणी याच मयत युवकावर पोलिसांनी कारवाई केली होती. (Nashik Crime youth killed due to previous dispute news)

अरमान मुन्नावर शेख (१८, रा. सुंदरनगर, नाशिकरोड) असे मयत युवकाचे नाव आहे. याप्रकरणी उपनगर पोलिसांनी संशयित रवी राठोड, झिंग्या उर्फ संदेश महाकाली, आकाश दिनकर यांना अटक केली असून, पसार झालेल्या संशयितांचा पोलिस शोध घेत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (ता. ७) रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास सदरचा प्रकार घडला आहे.

घटनेची माहिती मिळताच, परिमंडळ दोनच्या पोलिस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक आयुक्त डॉ. सचिन बारी, उपनगरचे वरिष्ठ निरीक्षक जितेंद्र सपकाळे, गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक निरीक्षक सचिन चौधरी यांनी घटनास्थळी धाव घेतली. संतप्त नातलगांनी संशयितांना त्वरित अटक करण्याची मागणी केली.

अरमानचा मित्र हितेश खलसे याच्या फिर्यादीवरून उपनगर पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे बिटको रुग्णालयात मयत अरमानच्या नातलग व मित्रांनी धाव घेत एकच गोंधळ घातला. त्यामुळे रुग्णालयात तणावाची परिस्थिती निर्माण झाली. पोलीसांचा फौजफाटा आल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली. (Latest Marathi News)

Murder News
Nagpur Crime News : प्रेयसीने बोलणे बंद केल्याने पेटविले दुकान; आरोपीला अटक

अशी घडली घटना

अरमान मंगळवारी रात्री साडेअकराच्या सुमारास त्याचा मित्र हितेश दादाभाऊ खालसे याला मोपेडमध्ये पेट्रोल भरण्यासाठी म्हणून सोबत घेऊन जयभवानी रोडवरील पेट्रोल पंपावर गेले. परंतु, पंप बंद असल्याने ते पुन्हा माघारी फिरले. त्यावेळी रस्त्यात संशयित चंप्या उर्फ आकाश दिनकर याने अरमानला अडविले असता त्याच्यासोबत संशयित रवी राठोड, झिंग्या उर्फ संदेश महाकाली हेही होते तर, दुचाकीवरुन आकाश तपासे (रा. गुलाबवाडी, मालधक्का रोड), टक्या उर्फ प्रेम व दोन अनोळखीही आले.

यावेळी संशयित आकाश दिनकर याने ‘तू आक्या भाईला मारतो का, घे आता रिप्लाय’, असे म्हणत त्याने अरमानवर धारदार हत्याराने सपासप वार केले. अरमान रक्ताच्या थारोळ्यात पडताच संशयितांनी पोबारा केला तर, अरमानचा मित्र हितेशही पळून गेला. परिसरातील रहिवाशांनी अरमानला बिटको रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित केले. (Latest Marathi News)

Murder News
Kolhapur Crime : दोन दुर्घटनांमध्ये सहा जणांचा बुडून मृत्यू; करेकुंडीत निवृत्त जवानाचा दोन मुलींसह अंत

रिल्सवाला ‘बकासूर’

मयत अरमान याने गेल्या फेब्रुवारी महिन्यात सोशल मीडियावर बकासूर या नावाने हॅण्डल होते. यावर तो भाईगिरीचे रिल्स अपलोड करायचा. ‘रावण कभी करता नही...’ असे कमेंट करीत तो भाईगिरी करायचा. याप्रकरणी गुन्हेशाखेने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे अरमानला ताब्यात घेतले होते. कुटूंबियांसमवेत पोलिसांनी त्याची भाईगिरी उतरविली होती. त्यानंतर भाईगिरीचे रिल्स केले नाही परंतु परिसरात भाईगिरीच्याच नादात तो वावरत असल्याने त्याने अनेकांशी वैर करून घेतल्याचे बोलले जाते. त्यातूनच सदरची घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले.

Murder News
Nanded Crime News : ज्येष्ठ नागरिकावर गोळीबार करून लुटले; ‘एटीएम‘ मधून पैसे काढून घरी परतताना घडला प्रकार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com