

Nashik
esakal
नाशिक: ऑनलाइन फसवणुकीच्या गुन्ह्याच्या तपासासाठी नाशिकमध्ये आलेल्या हिमाचल प्रदेशच्या पोलिसांनी शहरातील काही युवकांना अटकेची भीती दाखवून त्यांच्या पालकांकडून लाखो रुपये उकळल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. एका कामगार मुलाच्या पित्याकडून मुलाला सोडविण्याच्या बदल्यात सुमारे सव्वा ते दीड लाख रुपये उकळले आहेत. कामगाराने या सर्व प्रकाराची आपबीती 'सकाळ'कडे संपर्क साधत विशद केली. या घटनेमुळे हिमाचल प्रदेश पोलिस तपासकामी आले होते की वसुलीसाठी, असा प्रश्न उभा राहिला आहे.