Nashik Cyber Crime : ‘सेनी ट्रेडर्स’ ॲपवरून शेअर्स ट्रेडिंग भोवले; दोघांना 25 लाखांचा गंडा

Cyber Crime : शेअर्स ट्रेडिंगमध्ये आर्थिक गुंतवणूक करून जादा परताव्याचे आमिष दाखवून गंडा घातल्याचे अनेक प्रकार घडलेले असताना, आता सायबर भामट्यांनी नवीन क्लृप्ती वापरली आहे.
Cyber Crime
Cyber Crimeesakal

Nashik Cyber Crime : शेअर्स ट्रेडिंगमध्ये आर्थिक गुंतवणूक करून जादा परताव्याचे आमिष दाखवून गंडा घातल्याचे अनेक प्रकार घडलेले असताना, आता सायबर भामट्यांनी नवीन क्लृप्ती वापरली आहे. ‘सेनी ट्रेडर्स’ या ॲपच्या माध्यमातून शेअर ट्रेडिंग करून दामदुप्पत परताव्याचे आमिष दाखवून शहरातील दोघांना तब्बल २५ लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी शहर सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (nashik cyber crime Scam with lure of high returns by investing money marathi news)

विशाल सतिश सोनवणे (रा. भवानी पार्क अपार्टमेंट, जय भवानी रोड, नाशिकरोड) यांच्या फिर्यादीनुसार, त्यांना सायबर भामट्यांनी व्हॉटसॲप व ग्रुप इनव्हाईट लिंक पाठवून फसवणूक केली आहे. 4473119739980, 447761648676, 447877170975, 447425344352, 917049292878, 918989499162, 919662297116, 919531301763, 919008821932, 919148749697, 919051627997, 447311531934 या व्हाटस्अॅप लिंकधारक आणि बँक खात्यात पैसे वर्ग झालेल्या खातेदारांविरोधात सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सतिश सोनवणे आणि नीलेश पद्माकर खर्डे यांना संशयित अमृता शर्मा, डेरिंग मॅडम यांनी हे १ ऑगस्ट २०२३ ते १५ जानेवारी २०२४ दरम्यान सेनी ट्रेडर्स या ॲपद्वारे शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास जादा परताव्याचे आमिष दाखविले होते. सायबर भामट्यांनी व्हाटस्अप नंबरवरुन ‘लिंक’ पाठविली. ही लिंक स्वीकारून दोघांनी ग्रुप जॉईन केला. यानंतर सायबर भामटे अमृता शर्मा, डेरिंग मॅडम, अजय माथूर, मनोज कोहली, विद्या तालका यांनी दोघांचा विश्वास संपादन करून ॲपद्वारे पैसे गुंतविण्यास भाग पाडले.

Cyber Crime
Nashik Cyber Fraud Crime: दुपटीने वाढले सायबर फ्रॉड! नोकरीच्या आमिषातून तरुणांची 4 कोटींची फसवणूक

यामुळे विशाल यांनी १६ लाख तर नीलेश खर्डे यांनी ९ लाख रुपये ऑनलाइन ट्रान्सफर करुन गुंतविले. मात्र, अनेक महिने उलटूनही परतावा बँक खात्यात जमा होत नसल्याने त्यांना संशय आल्याने त्यांनी संशयितांना संपर्क साधला असता, त्यांच्याशी संपर्क होऊ शकत नव्हता. त्यांचे फोन बंद आले. यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी सायबर पोलिसात धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल झाला असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक रियाज शेख हे तपास करीत आहेत.

''कुठल्याही अमिषाला बळी पडू नये, अनोळखी लिंक क्लिक करु नये, लिंकचा वापर करून अनोळखी ग्रुपमध्ये जॉईन होऊ नये. गुंतवणूक करायची असल्यास राष्ट्रीयीकृत बँकेत जाऊन माहिती घ्यावी. बँक, एटीएमची कोणतीही गोपनीय माहिती शेअर करू नये. त्यामुळे फसवणुकीची शक्यता राहत नाही.''- रियाज शेख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, शहर सायबर पोलीस ठाणे.

Cyber Crime
Nashik Cyber Crime: क्रेडिट कार्ड ॲक्टिव्ह करण्याच्या बहाण्याने तिघांना गंडा! सायबर भामट्यांनी लांबविले साडेआठ लाख रुपये

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com