Nashik Cyber Crime: हॅलो मी मुंबई क्राईम ब्रँचमधून बोलतोय...अन मनीलाँड्रिग केल्याचे धमकावत भामट्याने 50 लाखांना घातला गंडा!

Crime News : याप्रकरणी नाशिक शहर सायबर पोलिसात अज्ञात सायबर भामट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Cyber Crime
Cyber Crimeesakal
Updated on

Nashik Cyber Crime : मुंबई क्राईम ब्रँचमधून बोलत भासवून, तुमच्या मोबाईलवरून मनीलॉड्रिंगचा व्यवहार झाल्याची भिती दाखविली आणि ५० लाख रुपये संशयितांनी त्यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यास सेवानिवृत्त कर्मचाऱ्यास भाग पाडून गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी नाशिक शहर सायबर पोलिसात अज्ञात सायबर भामट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (cyber criminal cheated 50 lakhs by threatening money laundering)

५९ वर्षीय फिर्यादी हे महिंद्रा अॅन्ड महिंद्रा कंपनीतून सेवानिवृत्त अहेत. त्यांच्या फिर्यादीनुसार, त्यांना २ ते १६ जून यादरम्यान, त्यांच्या मोबाईलवर अज्ञात संशयितांनी 85927696838222856817 मोबाईल क्रमांकावरून संपर्क साधत, आपण मुंबई क्राईम ब्रँचमधून विजय खन्ना, राहुल गुप्ता बोलत असल्याचे सांगितले आणि, तुमचा मोबाईल मनी लाँन्ड्रिंगच्या व्यवहारात निष्पन्न झालेला आहे. तसे संशयास्पद पुरावे आमच्या हाती असून त्यानुसार तुमच्यावर कठोर कारवाई होऊ शकते, अशी धमकीही दिली. अचानक आलेल्या या फोनमुळे सेवानिवृत्त कर्मचारी कारवाईच्या भितीने घाबरले.

संशयितांच्या त्यांच्या याच भितीचा गैरफायदा घेत सायबर भामट्यांनी तुम्हाला यातून सुटका करुन घ्यायची असेल तर, आम्ही सांगतो, त्यानुसार केल्यास तुम्हाला यातून आम्ही बाहेर काढू, असे सांगितले. त्यानंतर, सायबर भामट्यांनी सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या बँक खात्यावरील जमा रक्कम ४९ लाख ८९ हजार रुपयांची रक्कम त्यांनी दिलेल्या बँक खात्यांवर वर्ग करण्यास भाग पाडले. (latest marathi news)

Cyber Crime
Cyber Crime : सायबर चोरट्यांचा नवा फंडा; पैसे पाठवतो म्हणत पैसेच करतात गायब

तर, त्यांनी कारवाईच्या भितीने संशयितांनी दिलेल्या विविध बँक खाते, वॉलेटवर ते पैसे वर्ग केले. मात्र त्यानंतर फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी शहर सायबर पोलिसात धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक रियाज शेख हे करीत आहेत.

जमापूंजीवरच डल्ला

संशयित सायबर भामट्यांनी या गुन्ह्यात फिर्यादी यांच्याशी संपर्क साधण्यासाठी ‘स्काय-पी’चा वापर केला आहे. यावरूनच संशयित बोलत व चॅटिंग करीत होते. तसेच, त्यांनी फिर्यादी यांच्या बँक खात्याची माहितीही मिळविली असण्याची शक्यता आहे. फिर्यादींची गेलेली रक्कम ही त्यांची जमापुंजी होती. सायबर भामट्यांनी त्यांच्या उतारवयाच्या आर्थिक पूंजीवरच डल्ला मारला आहे.

Cyber Crime
Nashik Cyber Crime : शेअर मार्केटच्या नावाखाली 78 लाखांचा गंडा!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.