.jpg?rect=0%2C0%2C1200%2C675&w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
Ladaki Bahin Yojana : राज्यातील महिलांमध्ये लोकप्रिय ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना पुढील पाच वर्ष सुरू राहील, या दृष्टीने आर्थिक तरतूद केलेली आहे. त्यामुळे खोटा नेरेटिव्ह सेट करून राज्यातील जनतेची दिशाभूल करणाऱ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांना सडेतोड उत्तर देण्यासाठी महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी सज्ज राहण्याचे आवाहन राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री दादा भुसे यांनी केले. महायुती उत्तर महाराष्ट्र विभागाची समन्वय बैठक सोमवारी (ता. १२) शहरातील मनोहर गार्डन येथे झाली. (ladki bahin yojana will get money for 5 years)