Nashik Dams Water Storage : नाशिककरांची पाण्याची चिंता मिटली; जिल्ह्यातील धरणे ९४ टक्के भरली
Heavy Rain Boosts Nashik Dam Levels : नाशिक जिल्ह्यातील गंगापूर, दारणा आणि इतर धरणे ९४ टक्क्यांहून अधिक भरली; चौदा धरणांतून सतत विसर्ग सुरू असून पाण्याचा प्रश्न सुटण्याची खात्री.
नाशिक: वरुणराजाने जिल्ह्यावर केलेल्या कृपावृष्टीमुळे धरणांच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. प्रमुख २६ धरणांमध्ये ९४ टक्क्यांहून अधिक साठा आहे. त्यातील अकरा प्रकल्प काठोकाठ भरले आहेत.