Nashik News : तळवाडे दिगर परिसरातील रस्त्यांना मुहूर्त लागेना! खडीमुळे अपघातांची शक्यता

Nashik News : बागलाण तालुक्यातील पश्‍चिम पट्ट्यातील रस्त्यांच्या कामासाठी दोन महिन्यांपासून खडी टाकण्यात आली आहे
Gravel has been dumped on the side of the Satana-Talwade road for two months.
Gravel has been dumped on the side of the Satana-Talwade road for two months.esakal

तळवाडे दिगर : बागलाण तालुक्यातील पश्‍चिम पट्ट्यातील रस्त्यांच्या कामासाठी दोन महिन्यांपासून खडी टाकण्यात आली आहे. मात्र, प्रत्यक्षात कामाला मुहूर्त लागत नसल्यामुळे नागरीक संताप व्यक्त करीत आहे. (Nashik damaged Roads in Talwade Digar marathi news)

जोरण फाटा ते भवाडे व तळवाडे दिगर गावातील कॉंक्रीटीकरण, तळवाडे दिगर ते मोरकुरे संरक्षण भिंत व नवीन रास्ता, मोरेकुरे ते डांगसौंदाणे दरम्यानचा फरशी पूल भराव, कपालेश्‍वर ते कपालेश्‍वर फाटा आदी रस्त्यांचे काम गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून संथ गतीने सुरू असून, ठिकठिकाणी रस्ता खोदून ठेवला आहे. तर काही ठिकाणी रस्त्याच्या कडेला खडीचे ढिग टाकल्याने रस्त्याने ये-जा करताना खड्डे व धुळीचा त्रास सहन करावा लागतो. दरम्यान, अनेक ठिकाणी अपघात देखील होत आहेत.

रस्त्याचे काम संथ गतीने सुरू असल्यामुळे अनेकवेळा गावात येणाऱ्या बस अर्ध्या रस्त्यावरून माघारी जात असल्याने प्रवाशी व विद्यार्थ्यांना मन:स्ताप सहन करावा लागतो. दहावी व बारावीच्या परीक्षार्थींचे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती शक्यता आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग व ठेकेदारांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

Gravel has been dumped on the side of the Satana-Talwade road for two months.
Nashik News: अशी झाली ‘त्या’ दोघा तरुणांची सुटका! जगताप अन बागूल कुटुंबात आनंदोत्सव

विद्यार्थ्यांची शाळेला दांडी

रस्त्याचे काम संथ गतीने सुरु असल्याने बस बंद आहे. परिणामी, मळगाव व भवाडे येथील ४० ते ५० विद्यार्थ्यांना दररोज जंगलातून १५ ते २० किलोमीटरची पायपीट, तर काहींना शाळेला दांडी मारावी लागते. महाविद्यालयीन शिक्षणासाठी विद्यार्थी सकाळी ९ वाजता बसने तळवाडे दिगर येथे यायचे, तर सायंकाळी सहाच्या बसने घरी जायचे. मात्र, दोन महिन्यांपासून तळवाडे दिगर येथील विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन घनदाट जंगलातून शाळा गाठावी लागत आहे.

"बस बंद असल्याने आम्हाला दररोज मळगाव ते शाळा हे ८ ते १० किलोमीटर अंतर जंगलातून दररोज चालत यावे लागते. १ मार्चपासून शाळा सकाळच्या सत्रात भरत असल्यामुळे आम्हाला अंधारातच घरातून निघावे लागते. त्यामुळे लवकरात लवकर बस सुरू व्हावी."

- संदीप भोये, विद्यार्थी

Gravel has been dumped on the side of the Satana-Talwade road for two months.
Nashik Crime: कळवण बसस्थानक बनले सोनसाखळी चोरांचा अड्डा! कायमस्वरुपी पोलिस कर्मचारी नेमणुकीची मागणी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com