Nashik News : धक्कादायक! पेठ रुग्णालयात योग्य उपचाराअभावी गरोदर मातेचा मृत्यू; पोटातील बाळाचाही मृत्यू

Nashik News : पेठ ग्रामीण रुग्णालयात अपुऱ्या सोयी-सुविधा व स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टरांअभावी बुधवारी (ता. १३) गरोदर माता व बाळाचा पोटातच दुर्देवी अंत झाला
Death
Deathesakal

पेठ : पेठ ग्रामीण रुग्णालयात अपुऱ्या सोयी-सुविधा व स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टरांअभावी बुधवारी (ता. १३) गरोदर माता व बाळाचा पोटातच दुर्देवी अंत झाला. या घटनेमुळे तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. (Nashik Death of pregnant mother lack of proper treatment at Peth Hospital marathi news )

पेठसारख्या आदिवासी भागातील आरोग्य व्यवस्थेचे पुरते तीन तेरा वाजले आहेत. पेठ ग्रामीण रुग्णालयात दहा वर्षांपासून स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टरांची जागा रिक्त आहे. स्त्रीरोग तज्ज्ञांची नेमणूक करण्याची वारंवार मागणी करूनही स्त्रीरोग तज्ज्ञांची नेमणूक झालेली नाही. परिणामी, गरोदर मातेवर योग्य उपचार न झाल्याने बुधवारी कोटंबी येथील गरोदर माता कांचन सुरेश वार्डे (वय ३०, रा. कोटंबी) हीस जीवास मुकावे लागले व पोटातील बाळाचाही मृत्यू झाला.

पेठ येथील बेसुमार आरोग्य व्यवस्थेचा १४ महिन्यांपूर्वी एक व बुधवारी दुसरा बळी ठरला. कोटंबी येथील माहेर व गोंदेजवळील भवानीचा पाडा येथील सासर असलेली कांचन हिला प्रसूतीवेदना होत असल्याने येथील ग्रामीण रुग्णालयात बुधवारी दुपारी एकच्या सुमारास दाखल करण्यात आले.

रुग्णालयात उपस्थित डॉक्टर व परिचारिकेने उपचार केले. मात्र, मातेची प्रकृती अत्यंत बिकट होत असल्याचे लक्षात येताच नाशिकला हलविण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, पेठ रुग्णालयातच मातेचे प्राण गेल्याचे नातेवाइकांचे म्हणणे आहे. मातेच्या पोटात असलेले बाळ वाचविण्यासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, जिल्हा रुग्णालयात माता व बाळाची तपासणी केली असता, दोन्ही मृत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.  (latest marathi news)

Death
Nashik News : नियोजनशून्य कामांमुळे बाजारपेठ ठप्प! समस्यांमुळे व्यावसायिकांची नाराजी

पेठ ग्रामीण रुग्णालयाची वर्षानुवर्षापासून असलेल्या रोगट अवस्थेमुळे आदिवासी मातांची अवहेलना थांबण्याचे नाव घेत नसून जबाबदरी न घेण्यासाठी साधी प्रसूती असली, तरी पेठ रुग्णालयातून गरोदर मातेला नाशिक जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात येते.

कितीतरी प्रसूती रुग्णवाहिकेत रस्त्यातच होत असल्याचे समजते. अपु-या सोयी-सुविधा, औषधांची कमतरता, कर्मचाऱ्यांची मनमानी, स्वच्छतेचा अभाव, अशा अनेक अडचणीत गुदमरत असलेले पेठ ग्रामीण रुग्णालय कोणी अधिकरी किंवा मंत्री आल्यावर येथील मिजास एखाद्या खासगी रुग्णालयाला लाजवेल, अशी असते. नंतर मात्र, भोंगळ कारभार असतो. पेठ ग्रामीण रुग्णालयात स्त्रीरोग तज्ज्ञ, सोयी-सुविधा आतातरी मिळेल का? अजून किती माता, बालकांचा बळी घेणार ही व्यवस्था, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.

Death
NMC News : नाशिक महापालिका प्रशासकीय राजवटीची 2 वर्षे; प्रशासक राज लांबले, काम थांबले!

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com