UGC-NET Exam 2024 : 'यूजीसी नेट' नोंदणीसाठी उद्यापर्यंत वाढीव मुदत; राष्ट्रीय पातळीवर 18 जूनला होणार परीक्षा

Nashik News : जून सत्रातील यूजीसी नेट २०२४ या परीक्षेच्‍या नोंदणीची प्रक्रिया सध्या सुरु आहे. नोंदणी मुदत संपत असताना, मुदतवाढ देण्याचा निर्णय नॅशनल टेस्टिंग एजन्‍सी यांच्‍यातर्फे घेण्यात आला आहे.
UGC NET Exam
UGC NET ExamSakal

Nashik News : जून सत्रातील यूजीसी नेट २०२४ या परीक्षेच्‍या नोंदणीची प्रक्रिया सध्या सुरु आहे. नोंदणी मुदत संपत असताना, मुदतवाढ देण्याचा निर्णय नॅशनल टेस्टिंग एजन्‍सी (एनटीए) यांच्‍यातर्फे घेण्यात आला आहे. त्‍यानुसार आता मंगळवार (ता.१५) पर्यंत पात्रताधारक उमेदवारांना नोंदणी करता येईल. एनटीएतर्फे वर्षातून दोन सत्रांमध्ये युजीसी-नेट परीक्षेचे आयोजन केले जाते. (Decision to extend registration process for UGC NET 2024 exam)

त्‍यानुसार जून सत्रातील परीक्षा यापूर्वीच्‍या वेळापत्रकानुसार १६ जूनला होणार होती. परंतु या तारखेत बदल करताना आता १८ जूनला राष्ट्रीय पातळीवर या परीक्षेचे आयोजन केले जाणार आहे. ज्युनिअर रिसर्च फेलोशिप आणि सहाय्यक प्राध्यापक, पीएच. डी प्रवेश आदी विविध पदव्यांसाठी ही परीक्षा घेतली जाते.

सुधारित वेळापत्रकानुसार पात्रताधारक उमेदवारांना मंगळवार (ता.१५) पर्यंत नोंदणीची मुदत आहे. तर ऑनलाइन पद्धतीने शुल्‍क भरण्याची मुदत १६ व १७ मे अशी निश्‍चित केली आहे. अर्जामध्ये दुरुस्‍तीसाठी १८ ते २० मे या कालावधीत मुदत दिली आहे. (latest marathi news)

UGC NET Exam
Nashik ZP News : नाशिक जिल्हा परिषद निधी खर्चात अव्वल!

परीक्षा होणार ऑफलाइन

राज्‍यस्‍तरावरील सेट परीक्षा नुकतीच ऑफलाइन झाली होती. यापुढे ही परीक्षा ऑनलाइन पद्धतीने संगणकावर आधारित (कॉम्‍प्‍युटर बेस्‍ड टेस्‍ट) ही परीक्षा होणार आहे. तर दुसरीकडे यूजीसी-नेट जून सत्रातील परीक्षा ऑफलाइन ओएमआर (पेन व पेपर) शीटवर घेतली जाणार आहे. एकूण ८३ विषयांसाठी ही परीक्षा घेतली जाणार आहे.

UGC NET Exam
Nashik BJP News : काँग्रेसला मोठा धक्का! प्रदेश सरचिटणीस डॉ. तुषार शेवाळे यांच्या भाजप प्रवेशाने खळबळ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com