
नाशिक : इगतपुरीतील भावली धरणाचे पाणी शहापूरला देण्याचा निर्णय १८ डिसेंबरला न्यायालयात होण्याची शक्यता आहे. भावली धरणातील पाणी समान आरक्षणानुसार देण्यात यावे, या निर्णयास शासनाने मंजुरी दिली आहे. पाणी देण्यासंदर्भात प्रशासनाची तयारीही पूर्ण आहे. या निर्णयाविरोधात न्यायालयात याचिका दाखल आहे. त्यामध्ये भावली धरण जलद कालव्यासाठी आहे. त्यामुळे त्यावर आरक्षण देता येणार नाही, असे याचिकेत म्हटलेले आहे.