
नाशिक : राजपथावरील शिस्तबद्ध संचलन, विविध राज्यांचे देखावे, तसेच पंतप्रधान कार्यालयातील महत्त्वाच्या ठिकाणच्या भेटींनी राज्यातील २४ विशेष आदिवासी अक्षरशः भारावून गेले. यात राजपथावरील संचलनाबरोबरच आदिवासी बांधवांनी संसद भवन भेट, मेट्रो राइड, प्रधानमंत्री संग्रहालय आदी ठिकाणी भेट दिली.