Nashik Dengue Update: वर्षभरात एक हजारांहून अधिक डेंगी रुग्ण; आठवडाभरात 80 नवे रुग्ण आढळल्याने चिंता

Dengue Infection
Dengue Infectionesakal

नाशिक : डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शहरात ८० नवीन डेंगी रुग्ण आढळले आहेत. वर्षभरात बाधितांचा एकूण आकडा आता १०६५ च्या वर पोचला आहे.

एसटीच्या कार्यालयात डेंगी अळीचे उत्पत्ती ठिकाणे आढळून आल्याने विभागीय नियंत्रकांना नोटीस बजावण्यात आली आहे. (Nashik Dengue Update More than thousand dengue cases in year Concerned 80 new patients found in week)

शहरात सध्या डेंगी रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. परिणामी नागरिकांवर वैद्यकीय खर्चाचा भार वाढला आहे. ऑक्टोबर महिन्यात डेंगीचे १९३ बाधित आढळले होते. नोव्हेंबर महिन्यात पावणेतीनशे रुग्णांना बाधा झाली.

डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ८९ नवे डेंगी बाधित रुग्ण आढळले. त्यामुळे डेंगी बाधितांचा एकूण आकडा आता १०६५ च्या वर गेला. डेंगीसदृश लक्षणे आढळलेल्या २०० रुग्णांचे रक्तनमुने अहवाल तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे प्रलंबित आहेत.

दरम्यान, डेंगी निर्मूलन मोहिमेअंतर्गत डास उत्पत्तीस्थळांचा शोध घेताना एनडी पटेल रोडवरील राज्य परिवहन महामंडळाच्या विभागीय नियंत्रण कार्यालयाच्या आवारात बस डेपोची पाहणी केली.

Dengue Infection
Nashik Dengue Update: शहरात डेंगीचे दोन बळी

तेथे गटारीचे उघडे चेंबर, वाहने धुण्यासाठी वापरले जाणाऱ्या पाण्यामुळे साचलेली डबक्यात डेंगी डासांची उत्पत्ती होत असल्याचे आढळून आल्याने विभाग नियंत्रकांना नोटीस बजावण्यात आली.

त्याचबरोबर शिंगाडा तलाव परिसरातील एका बांधकाम परिसरातील टाकीत डेंगी डासांच्या अळ्या आढळल्याने त्याच्याकडून ५ हजार रुपये दंड वसुल करण्यात आला.

जुने नाशिकमधील सुमन नाईक शाळा परिसरात डासांचा उच्छाद वाढल्याची तक्रार असल्याची माहिती मलेरिया विभागाचे प्रमुख डॉ. नितीन रावते यांनी दिली.

Dengue Infection
Nashik Dengue News: डेंगी अळ्यांची उत्पत्ती स्थाने निर्माण केल्याने नाशिक रोड रेल्वेस्थानक प्रबंधकांना नोटीस

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com