Nashik News : उपजिल्हाधिकारी भारदे यांची अवघ्या 7 महिन्यांत बदली

Nashik : गेल्या वर्षी जुलैमध्ये उपजिल्हाधिकारीपदी रुजू झालेल्या शुभांगी भारदे यांची अवघ्या सात महिन्यांतच बदली झाली आहे.
Transfers
Transfersesakal

Nashik News : गेल्या वर्षी जुलैमध्ये उपजिल्हाधिकारीपदी रुजू झालेल्या शुभांगी भारदे यांची अवघ्या सात महिन्यांतच बदली झाली आहे. केवळ निवडणूक विभागातील जागा रिक्त ठेवता येत नसल्याने ही बदली झाल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येते. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शासकीय अधिकाऱ्यांचे बदली सत्र सध्या सुरू आहे. (nashik Deputy Collector Bharde transferred months marathi news)

निवडणूक विभागातील जागा रिक्त ठेवू नयेत, असे शासनाचे आदेश आहेत. त्या अनुषंगाने तहसीलदार, उपजिल्हाधिकारी यांच्या बदल्या होत असताना त्यांचा किमान दोन ते तीन वर्षे सेवाकाल ग्राह्य धरला जातो.

याशिवाय, स्थानिक अधिकाऱ्यांना दुसऱ्या जिल्ह्यात बदली दिली जाते; परंतु नाशिक जिल्ह्यात २८ जुलै २०२३ ला म्हणजे अवघ्या सात महिन्यांपूर्वीच भूसंपादन उपजिल्हाधिकारी आणि भूसंपादन समन्वय अधिकारीपदी नियुक्ती मिळालेल्या शुभांगी भारदे यांची शासनाने पुनर्वसन विभागाच्या उपजिल्हाधिकारीपदी बदली केली आहे. त्यामुळे जरी कार्यालय एकच असले, तरीही नॉन इलेक्शन पदावरून इलेक्शन पदावर त्यांची नियुक्ती झाल्याने महसूल विभागात चांगली चर्चा रंगली आहे. (latest marathi news)

Transfers
Nashik News : येवल्यात 3 कोटींच्या विकासकामांना मंजुरी; मंत्री भुजबळांचा पाठपुरावा

‘मॅट’मध्ये जाण्याची शक्यता

अवघ्या सात महिन्यांत बदली झाल्याने शुभांगी भारदे या ‘मॅट’मध्ये जाण्याची शक्यता असल्याचे बोलले जाते. बदलीच्या दुसऱ्याच दिवशी त्यांनी मुंबई गाठत या प्रकरणी दाद मागितल्याचे समजते. त्यामुळे भारदे यांची बदली रद्द होते की कायम राहते, याकडे जिल्हा प्रशासनाचे लक्ष लागून आहे.

Transfers
Nashik News: यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा कुसुमाग्रज राष्ट्रीय साहित्य पुरस्कार गुलजार यांना प्रदान

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com