Dhule Lok Sabha Constituency : डॉ. बच्छाव यांच्या विजयाने ‘मालेगाव मध्य’मध्ये जल्लोष; तर ‘बाह्य’मध्ये नैराश्‍य

Lok Sabha Constituency : धुळे लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या कॉंग्रेसच्या उमेदवार डॉ. शोभा बच्छाव विजयी होताच मालेगाव मध्य मध्ये समर्थकांनी जल्लोष केला.
Dhule Lok Sabha Constituency
Dhule Lok Sabha Constituencyesakal

मालेगाव : धुळे लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या कॉंग्रेसच्या उमेदवार डॉ. शोभा बच्छाव विजयी होताच मालेगाव मध्य मध्ये समर्थकांनी जल्लोष केला. भर पावसात फटाके फोडत आनंद व्यक्त केला. कॉंग्रेस पक्षाचे पंजा चिन्ह असलेला ध्वज हातात घेत चौका चौकात कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता. दुसरीकडे कॅम्प-संगमेश्‍वरच्या पट्ट्यात मात्र कही खुशी कही गम असे वातावरण होते. (Dhule Lok Sabha Constituency)

दुपारी चारच्या दरम्यान जल्लोषाच्या तयारीत असलेल्या भाजप कार्यकर्त्यांचा डॉ. सुभाष भामरे यांच्या पराभवामुळे हिरमोड झाला. धुळे लोकसभेची निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. सकाळपासूनच डॉ. सुभाष भामरे यांच्या आघाडीचे वृत्त आल्याने कॅम्प- संगमेश्‍वरसह मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघात काहीसे आनंदाचे वातावरण होते. तर मालेगाव मध्य मध्ये सर्वत्र नैराश्‍य पसरले होते. सायंकाळी मतमोजणीत अचानक ट्विस्ट आला.

डॉ. बच्छाव यांच्या विजयाची बातमी येथे आली तेव्हा मालेगावात जोरदार पाऊस सुरु होता. मुस्लीम बहुल असलेल्या मालेगाव मध्य मध्ये हजारो कार्यकर्ते व नागरीकांनी रस्त्यावर येत आनंद साजरा केला. भर पावसात कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी केली. (latest marathi news)

Dhule Lok Sabha Constituency
Dhule Lok Sabha Constituency : भाजपनेच भाजपला पाडले! शेतकऱ्यांसह मुस्लिम, इतर घटकांची नाराजी काँग्रेसच्या पथ्यावर

मालेगाव मध्य सातत्याने कॉंग्रेसच्या बाजूने उभा असतो. गेल्या चार निवडणुकीत प्रथमच या भागातील कार्यकर्ते व नागरिकांना डॉ. बच्छाव यांच्या विजयामुळे आनंदोत्सव साजरा करण्याची संधी मिळाली. डॉ. बच्छाव यांच्या विजयानंतर मालेगाव मध्यमध्ये चौकाचौकात नागरिक थांबून होते. रात्री उशिरापर्यंत हॉटेल, उपहारगृह व चहा दुकानांवर समर्थकांनी गर्दी केली होती. तर दुसरीकडे डॉ. भामरेंचा पराभव झाल्यानंतर त्यांचे समर्थक नाराज झाले.

निसटत्या पराभवाची कारणमिमंसा करताना महायुतीचे नेते व कार्यकर्ते दिसत होते. मालेगाव मध्य वगळता उर्वरित पाच विधानसभा मतदारसंघात डॉ. भामरेंना आघाडी मिळाली आहे. त्यामुळे त्यांचा पराभव कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागला. तालुक्याच्या ग्रामीण भागात कॉंग्रेससह महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी पेढे वाटून आनंद व्यक्त केला

Dhule Lok Sabha Constituency
Dhule Lok Sabha Constituency : चिवट लढतीत बच्छाव विजयी; भाजपच्या डॉ. भामरेंची हॅटट्रिक हुकली

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com