Dindori Lok Sabha Election 2024 Result : कांदान कया भाजपना वांदा; दिंडोरीमा कांदांन वाजी तुतारी!

Nashik News : लोकसभेच्या निवडणुकीत शेतकऱ्यांचे प्रश्‍नांकडे विशेषत: कांद्याकडे दुर्लक्ष केल्याने सरकारला त्याची किंमत मोजावी लागल्याचे ज्ञात होते.
Onion
Onion esakal

Nashik News : लोकसभेच्या निवडणुकीत शेतकऱ्यांचे प्रश्‍नांकडे विशेषत: कांद्याकडे दुर्लक्ष केल्याने सरकारला त्याची किंमत मोजावी लागल्याचे ज्ञात होते. दुसऱ्यादा सत्तेवर येऊन मात्र मोदी सरकारने वारंवार शेतकरी हिताची निर्णय घेण्याऐवजी शेतकरी विरोधी धोरण अवलंबले. कांदा उत्पादक दिंडोरी मतदार संघात भारती पवार यांना कांद्याने खासदार केलं. (Dindori Lok Sabha Election 2024 Result)

भारती पवार मंत्री झाल्या. मात्र, कांद्याचे दर वाढले की निर्यात बंद केली जात होती. शेतकऱ्यांच्या विरोधात भूमिका घेतल्याने मतदारसंघात रोष वाढत गेला. शेतकऱ्यांचा आक्रोश आणि त्यांच्या मनातील भावना एकजुटीने मतदानात दिसून आल्या अन् दिंडोरी मतदारसंघात ‘कांदान भाजपना कया वांदा; दिंडोरीमा कांदांन वाजी तुतारी’ अशी चर्चा निकालातून सर्वत्र होऊ लागली.

दिंडोरी मतदारसंघात कांदा, द्राक्ष, धान्य, डाळी आदींचे सरकारचे अन्यायकारक आणि एकतर्फी शेतमाल निर्यात धोरण निवडणुकीत मुख्य मुद्दे राहिले. त्यामुळे आपसूकच भाजपविषयी नाराजीचे वातावरण तयार होत गेले. निवडणूक सुरु असताना गुजरातच्या कांद्याला निर्यात खुली, कांद्याची निर्यात शुल्कवाढ ही धोरणे कांदा उत्पादकांच्या जखमेवर मीठ चोळणारी ठरली. (latest marathi news)

Onion
Nashik Lok Sabha Election 2024 Result : राजाभाऊ वाजेंची विजयी मिरवणूक

नांदगाव, येवला, चांदवड या मतदारसंघातील फक्त पावसाळी कांदा हे एकमेव पिक असतांना उत्पादन हातात आल्यावर डिसेंबरपासून निर्यातबंदीच्या निर्णयामुळे या तालुक्यात अधिक रोष वाढला. तर चांदवड, निफाड या भागात कांदा व द्राक्ष या दोघाही पिकांना बसलेला फटका या भागातील मतदारांनी प्रचारकाळात भारती पवारांना केलेल्या विरोधातून तीव्र होत गेला.

कांद्यामुळेच भारती पवार मंत्री झाल्या अन् कांद्यानेच त्यांना पाडून शेतकऱ्यांनी जमिनीवर आणल्याच्या प्रतिक्रिया सोशल माध्यमातून पहायला मिळाल्या. कांदा, द्राक्ष, भाजीपाला कडधान्य, सोयाबीन, कापूस कशालाच भाव मिळाला नाही. याचा सर्व वचपा नाशिक व दिंडोरी मतदारसंघात मतदारांनी काढला.

Onion
Nashik Lok Sabha Election 2024 Result : भगरे यांच्या विजयाने ‘राष्ट्रवादी’चा वनवास संपला! पहिल्या निवडणुकीत भगरे दिल्लीत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com