Nashik Lok Sabha Constituency
Nashik Lok Sabha Constituency esakal

Nashik Lok Sabha Constituency : प्रचाराच्या अजेंड्यातून विकासाचे मुद्दे गायब!

Lok Sabha Constituency : लोकसभेच्या नाशिक व दिंडोरीत मतदारसंघामध्ये शेवटच्या टप्प्यात प्रचार शिगेला पोहोचला असताना दुसरीकडे विकासाचे मुद्दे मात्र प्रचारातून गायब झाले आहेत.

Nashik News : लोकसभेच्या नाशिक व दिंडोरीत मतदारसंघामध्ये शेवटच्या टप्प्यात प्रचार शिगेला पोहोचला असताना दुसरीकडे विकासाचे मुद्दे मात्र प्रचारातून गायब झाले आहेत. महायुती व महाविकास आघाडी दोन्हींच्या बाबतीत हा प्रकार होत आहे. नाशिक-पुणे रेल्वे, आयटी पार्क, औद्योगिक भुसंपादन, विमानसेवा या सारख्या मुद्यांवर चर्चा होत नाही. (Nashik Lok Sabha Constituency)

तीन वर्षांनी नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा होत आहे. कुंभमेळा नियोजनाबद्दलही चर्चा होत नसल्याने नाशिककरांना अपेक्षित असलेले मुद्दे भरकटविले जात आहेत. लोकसभेच्या नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी येत्या २० मे रोजी पाचव्या टप्प्यातील मतदान होत आहे. प्रचाराला पाच दिवस शिल्लक राहिल्याने महाविकास आघाडी व महायुतीकडून प्रचार शिगेला पोहोचला आहे.

युती व आघाडीचे वरिष्ठ नेत्यांच्या नाशिकमध्ये चकरा वाढल्या आहेत. परंतु प्रचाराचा जोर चढत असताना नाशिककरांना ज्या मुद्द्यावर चर्चा व्हावी असे वाटणारे विकासाचे मुद्दे मात्र हवेतच विरल्याचे दिसून येत आहे. उमेदवारांच्या प्रचार पत्रकांवर भविष्यात काय करणार या योजनांचा उल्लेख असला तरी सध्या रखडलेले प्रकल्प व नाशिकच्या विकासाला बूस्टर डोस देणारे प्रकल्प अद्यापही कागदावर आहेत, याबद्दल मात्र दोन्हींकडूनही बोलले जात नाही. (Latest Marathi News)

Nashik Lok Sabha Constituency
Nashik Lok Sabha Election : जिल्ह्यातील 5 दारूची दुकाने आठवडाभरासाठी बंद

सध्याचा प्रचार हा वैयक्तिक हवे दावे, सोशल मीडियावर एखादे गाणे लावून मतदारांसमोर जाणे एवढ्यावरच थांबला आहे. आघाडी व युतीचे नेतेदेखील नाशिकमध्ये येऊन भाषणांमध्ये नाशिकच्या विकासाच्या मुद्द्यांना हात घालत नाहीत. यापूर्वी विकासाचे मुद्दे चर्चेला गेले मात्र सत्ता आल्यानंतर नाशिकच्या प्रकल्प व मुद्द्यांकडे लक्ष दिले गेले नाही. त्यामुळे निवडणुकीमध्ये प्रचार करताना रखडलेले प्रकल्प, नाशिकच्या विकासाचे मुद्दे चर्चेत यावेत, अशी मागणी विशेष करून युवा वर्गाकडून केली जात आहे.

- आयटी पार्कचा खेळखंडोबा, लॉजिस्टीक पार्क लालफीतीत.

- नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प कागदावरचं.

- औद्योगिक वसाहतीसाठी अतिरिक्त भुसंपादन.

- आचके खात सुरु असलेल्या सेवेला हवा बुस्टर.

- फुड प्रोसेसिंग हबची घोषणा विरली हवेत.

- प्रशासकीय कामकाजात गंटांगळ्या खातोय प्रकल्प नमामी गोदा.

- टायर बेस मेट्रो निओ प्रकल्पासाठी ‘तारीख पे तारीख'.

- इलेक्‍ट्रिक टेस्टींग लॅब उभारणीत अडथळ्यांची शर्यत.

- आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडीअम.

- मनोरंजन पार्क.

- मुंडेगाव फिल्मसिटी.

Nashik Lok Sabha Constituency
Nashik Lok Sabha Election : मतदान केंद्रावर सेक्टर अधिकार्यांचा असेल ‘वॉच’; शहर विशेष शाखेचे नियोजन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com