Dindori Lok Sabha Constituency : हरिश्चंद्र चव्हाणाचं बंड झालं थंड; फडणवीसांच्या शिष्टाईने दिंडोरीतून माघार

Lok Sabha Constituency : भाजपने डॉ. पवार यांना उमेदवारी दिल्याने माजी खासदार चव्हाण नाराज झाले होते. त्यांनी अनेकदा आपली नाराजी बोलून दाखविली होती.
Harishchandra Chavan, Devendra Fadnavis
Harishchandra Chavan, Devendra Fadnavisesakal

Dindori Lok Sabha Constituency : दिंडोरी लोकसभा मतदारसंघात भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे महायुतीची डोकेदुखी वाढली होती. मात्र चव्हाण यांची समजूत काढण्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना यश आले आहे. (Dindori Lok Sabha Constituency)

दरम्यान, चव्हाण यांचे पक्षाकडून योग्य ठिकाणी पुनर्वसन करून देण्यात येईल, असे आश्वासन मिळाल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे चव्हाण यांनी सोमवारी (ता. ६) आपला उमेदवारी अर्ज माघारी घेतला. त्यांच्या माघारीने महायुतीला दिलासा मिळाला आहे. दिंडोरी लोकसभा मतदारसंघात भाजपने पुन्हा एकदा केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्यावर विश्वास टाकत त्यांना रिंगणात उतरविले आहे.

भाजपने डॉ. पवार यांना उमेदवारी दिल्याने माजी खासदार चव्हाण नाराज झाले होते. त्यांनी अनेकदा आपली नाराजी बोलून दाखविली होती. यातच त्यांनी मतदारसंघाचा दौरा करून समर्थक, कार्यकर्त्यांशी चर्चा करून चव्हाण यांनी उमेदवारी अर्ज दाखल करत बंडखोरी केली होती. चव्हाण यांच्या बंडखोरीमुळे महायुतीला धक्का बसला होता.

उमेदवारी अर्ज दाखल करू नये, यासाठी भाजपचे महाराष्ट्र प्रभारी खासदार दिनेश शर्मा यांनी माजी खासदार चव्हाण यांच्याशी चर्चा करत त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. तसेच केंद्रीय राज्यमंत्री डॉ. पवार यांनीही चव्हाण यांची जिल्हाधिकारी कार्यालयात भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले होते. त्या वेळी त्यांनी अर्ज दाखल करू नये, अशी विनंती देखील केली होती. मात्र, चव्हाण उमेदवारी ठाम होते. (Latest Marathi News)

Harishchandra Chavan, Devendra Fadnavis
Nashik Lok Sabha Constituency : गोडसे, वाजेंसह 2 महाराज नाशिकच्या आखाड्यात; करंजकर, अरिंगळेंसह 5 इच्छुकांची माघार

प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी रविवारी (ता. ५) चव्हाण यांच्याशी संपर्क करत चर्चा केली. एकदा नव्हे, तर तीन ते चार वेळेस ही चर्चा झाल्याचे समजते. त्यानंतर माजी जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांनी चव्हाण यांची भेट घेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चव्हाण यांच्याशी फोनद्वारा संवाद साधून दिला. यात चव्हाण यांनी आपली खदखद व्यक्त केल्याचे सांगितले जात आहे. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांची बाजू ऐकून घेत त्यांच्याशी पुन्हा चर्चा केली. त्यानंतर सोमवारी पुन्हा चर्चा झाल्याचे बोलले जात आहे.

त्यानंतर चव्हाण यांची नाराजी दूर झाली. नाराजी दूर झाल्यानंतर चव्हाण यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. चव्हाण यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने महायुतीला दिलासा मिळाला आहे. तीन टर्म खासदार राहिलेले चव्हाण यांचा मतदारसंघात मोठा संपर्क आहे. त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. वरिष्ठांकडून चव्हाण यांची मनधरणी झालेली असली तरी स्थानिक पातळीवर ते प्रचारात सहभागी होणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

"उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास गिरीश महाजन, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चा झाली. त्यांनी पुनर्वसन करून घेण्याचे आश्वासन दिले आहे. याशिवाय आजारी असल्याने उमेदवारी करणे शक्य नसल्याने माघारी घेतली."

- हरिश्चंद्र चव्हाण, माजी खासदार, भाजप

Harishchandra Chavan, Devendra Fadnavis
Nashik Lok Sabha Election : नाशिक, दिंडोरीत ‘तोफा’ धडाडणार; पंतप्रधानांची सभा 17 ला?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com