Dindori Lok Sabha Constituency : कोण आहेत बाबू भगरे? शरद पवार यांनी घेतली अपक्ष भगरेंची दखल

Nashik News : उमेदवार भास्कर भगरे यांच्या नावात साम्य असलेले अपक्ष उमेदवार बाबू सदू भगरे यांनी तब्बल एक लाख तीन हजार ६३२ मते घेतल्याने त्यांचा राज्यभर बोलबाला झाला.
Dindori Lok Sabha Constituency
Dindori Lok Sabha Constituencyesakal

Nashik News : दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे विजयी उमेदवार भास्कर भगरे यांच्या नावात साम्य असलेले अपक्ष उमेदवार बाबू सदू भगरे यांनी तब्बल एक लाख तीन हजार ६३२ मते घेतल्याने त्यांचा राज्यभर बोलबाला झाला. या भगरेंची खुद्द राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दखल घेतली.

कोण आहेत हे बाबू भगरे, त्यांनी इतकी मते कशी घेतली अशी विचारणा जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांकडे करीत आश्चर्य व्यक्त केले. दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार भास्कर भगरे यांनी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांचा एक लाख १३ हजार १९९ मतांनी पराभव केला.

मात्र, दिंडोरीच्या मतमोजणीदरम्यान भास्कर भगरे यांच्या नावात साम्य असलेले उमेदवार बाबू सदू भगरे यांची जोरदार चर्चा रंगली. कारण, बाबू भगरे यांनी तब्बल एक लाख तीन हजार ६३२ मते घेतली. डमी भगरे यांनी घेतलेल्या या मतांमुळे ते चांगलेच चर्चेत आले. त्यानंतर ते कोठून आल्याचा शोध घेतला गेला.

यात ‘राष्ट्रवादी’ने भास्कर भगरे यांना उमेदवारी दिल्यावर त्यांच्याशी मिळते-जुळते नाव असलेल्या बाबू भगरे यांचा भारतीय जनता पक्षाने शोध घेत त्यांना अपक्ष म्हणून रिंगणात उतरविले. त्यांना पिपाणी हे चिन्ह मिळविले. ऐनवेळी त्यांनी आपल्या नावात बदल करून ‘सर’ ही उपाधीही लावून घेतली. (latest marathi news)

Dindori Lok Sabha Constituency
Dindori Lok Sabha Constituency : शेतकरी, कांदा प्रश्नाने लावला भाजपच्या गडाला सुरुंग

ईव्हीएम मशिनवर त्यांचे नाव दहाव्या क्रमांकावर असले तरी मतदारांना राष्ट्रवादीचे चिन्ह स्पष्टपणे दिसले नाही किंवा सर या एका नावामुळे मतदारांची दिशाभूल झाली अन त्यांच्यावर मतांचा पाऊस पडला. प्रत्येक फेरीत बाबू भगरेंना हजारांच्या पटीत मते मिळाल्याने २६ व्या फेरीअखेर त्यांना एक लाख तीन हजार ६३२ मते मिळाली.

भगरेंना मिळालेल्या मतांनंतर त्यांची राजकीय वर्तुळात मोठी चर्चा झाली. ‘राष्ट्रवादी’चे नेते शरद पवार यांनीही त्यांची दखल घेतली. गुरुवारी (ता. ६) दिंडोरीचे नवनिर्वाचित खासदार भास्कर भगरे यांच्यासह जिल्ह्यातील ‘राष्ट्रवादी’च्या शिष्टमंडळाने मुंबईतील प्रदेश कार्यालयात शरद पवार यांची भेट घेतली.

त्या वेळी पवार यांनी ते बाबू भगरे नेमके कोण आहेत, कुठले आहेत अशी विचारणा केली. तसेच, त्यांना इतकी मते कशी मिळाली, याबाबतही विचारणा केली. त्या वेळी जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी भगरेंबाबत माहिती दिली.

Dindori Lok Sabha Constituency
Dindori Lok Sabha Constituency : कांदा निर्यातबंदी दोष; उत्पादकांचा मतदानातून रोष! डॉ. भारती पवारांना नडला बळीराजा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com