Nashik News : व्हीलचेअरव्दारे अपंग श्‍वानाला धावण्याचे बळ; पंचवटीतील तरुण टेलरच्या उपक्रमाचे अनेकांकडून कौतुक

Nashik : एका तरुणाने भूतदया जपत एका अपंग श्‍वानाला व्हीलचेअरचे बळ देत चक्क धावण्याचे बळ दिले आहे.
It is the same dog who rides in a wheelchair.
It is the same dog who rides in a wheelchair.esakal

Nashik News : आजच्या धकाधकीच्या जीवनात माणसाला माणसाच्या दुःखाकडे, वेदनेकडे पाहण्यासाठी वेळ नाही, अशा काळात एका तरुणाने भूतदया जपत एका अपंग श्‍वानाला व्हीलचेअरचे बळ देत चक्क धावण्याचे बळ दिले आहे. व्यवसायाने टेलर असलेल्या पंचवटीतील या तरुणाच्या उपक्रमाचे अनेकांनी प्रत्यक्ष भेटून भरभरून कौतुक केले. श्रीकांत खैरनार यांचे श्री काळाराम मंदिर दक्षिण दरवाजाजवळ एस. के. टेलर्स हे छोटे लेडीज टेलरिंगचे दुकान असून त्याद्वारे ते आपल्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करतात. (Nashik disabled dog is given power to run by wheelchair marathi news)

खैरनार मध्यंतरी काही कामानिमित्त गंगापूर गावातील नातेवाइकांकडे गेले होते. त्याठिकाणी त्यांना मागील दोन्ही पाय जायबंदी झालेले श्‍वान आढळले. भटक्या कुत्र्यांच्या दंशामुळे संबंधित श्‍वानाचे मागील दोन्ही पाय निकामी झाल्याने संबंधित श्‍वानाला चालताना अतिशय वेदना होत असल्याचे खैरनार यांना जाणवले. गंगापूरहून घरी आल्यावरही त्यांना सारखा तो श्‍वानच दिसत होता. त्यानंतर त्यांनी त्याच्यासाठी काहीतरी करण्याचा ध्यास घेतला.

त्यांनी पदरमोड करत व्हील व पीव्हीसी पाइप विकत घेतले. त्यानंतर ग्राइंडर, कटरच्या माध्यमातून त्यांनी जुगाड तंत्रज्ञानाचा वापर करत व्हीलचेअरची निर्मिती केली. यामुळे संबंधित श्‍वानाला चालता येऊ शकेल. परंतु यापुढील अडचण अजून मोठी होती. संबंधित श्‍वान ओळखीचे नसल्याने व्हीलचेअरवर बसविताना ते चावले तर काय, परंतु ही भीती दूर करत त्यांनी प्रयत्नपूर्वक त्या श्‍वानाला व्हीलचेअरवर बसविले. .(latest marathi news)

It is the same dog who rides in a wheelchair.
Nashik News : राजकारण्यांपेक्षा साहित्यिक अधिक असहिष्णू : श्रीकांत बोजेवार

सुरवातीला ते त्यावर बसण्यास घाबरत होते, परंतु दोन-तीन दिवसांच्या सरावानंतर ते आता व्हीलचेअरसह इकडून तिकडे फिरू लागले आहे. खैरनार यांचा हा उपक्रम यशस्वी झाल्याने व संबंधित श्‍वान व्हीलचेअरवर फिरू लागल्यावर अनेकांनी दूरध्वनीद्वारे खैरनार यांच्या भूतदयेचे कौतुक केले. भविष्यात भटक्या जखमी कुत्र्यांसाठी काम करण्याचा मनोदय खैरनार यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केला.

''देवाने माणसाला जन्म दिला तोच मुळी परोपकारासाठी. जेव्हा हे अपंग श्‍वान बघितले, तेव्हाच त्याच्यासाठी काहीतरी करण्याचा ध्यास घेतला. आता ते व्हीलचेअरवर फिरताना पाहून मनस्वी समाधान व आनंद वाटतो.''- श्रीकांत खैरनार, संचालक, एस.के. टेलर्स

It is the same dog who rides in a wheelchair.
Nashik News : रशियन राज्यक्रांतीचे नायक लेनिन एकाधिकारीशाहीविरोधात : डॉ. उदय नारकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com