
चांदोरी : मध्य रेल्वे मार्गावर मनमाड ते खेरवाडी या दरम्यान गुरुवार दि. ५ नोव्हेंबर रोजी सकाळी पावणेसहा वाजेच्या दरम्यान राज्यराणी एक्सप्रेस मध्ये प्रवाशांच्या दोन गटात जोरदार हाणामारी झाली, दरम्यान प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित आरोपी हे शस्त्रधारी होते मोबाईल चोरी गेल्याचा बहाणा करत त्यांनी प्रवाशांना मारहाण केली व खेरवाडी स्थानकावरून लंपास झाले असल्याचे सांगितले.