Nashik Lok Sabha Election : गोडसे, वाजे, भगरेंना ‘सोशल’ प्रचार थांबविण्याची नोटीस!

Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांनी सोशल मीडियावर कोणत्याही प्रकारचे प्रसारण करताना त्याआधी माध्यम प्रमाणिकरण समितीची (एमसीएमसी) पूर्वपरवानगी घेणे आवश्‍यक असते.
Notice
Notice esakal

Nashik News : निवडणूक विभागाची पूर्वपरवानगी न घेताच सोशल मीडियावर सुरू केलेला प्रचार महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे, महाविकास आघाडीचे राजाभाऊ वाजे, अपक्ष शांतिगिरी महाराज, सिद्धेश्‍वरानंद सरस्वती, तर दिंडोरीतील महाविकास आघाडीचे भास्कर भगरे यांना भोवण्याची शक्यता आहे. (promoted on social media without taking permission of election department)

निवडणूक विभागाची परवानगी न घेता सोशल मीडियावर प्रचार सुरू केल्याने त्यांना जिल्हाधिकारी जलज शर्मा व अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे यांनी नोटीस बजावली आहे. सोशल मीडियावरील प्रचार तातडीने थांबविण्याचे आदेश देत याप्रकरणी ४८ तासांच्या आत खुलासा करण्याचे आदेश नोटिशीद्वारे बजावले आहेत. त्यामुळे उमेदवारांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांनी सोशल मीडियावर कोणत्याही प्रकारचे प्रसारण करताना त्याआधी माध्यम प्रमाणिकरण समितीची (एमसीएमसी) पूर्वपरवानगी घेणे आवश्‍यक असते. मात्र, सोशल मीडियावर प्रचारासाठी परवानगी घेण्याची आवश्‍यकता नसल्याच्या गैरसमजातून किंवा जाणीवपूर्वक सोशल मीडियाचा वापर प्रचारासाठी केला जात असल्याचे माध्यम मॉनिटरिंग विभागाच्या निदर्शनास आले आहे.

यानंतर त्यांनी उपरोक्त पाच उमेदवारांना सोशल मीडियावरील प्रचार थांबविण्याचे आदेश दिले. येत्या ४८ तासांच्या आत त्यांनी खुलासा करणे बंधनकारक असून, योग्य खुलासा प्राप्त न झाल्यास उमेदवारांच्या माध्यम प्रतिनिधीवर कारवाई करण्यात येईल. तसेच उमेदवारांचीही यामुळे डोकेदुखी वाढणार आहे. (Latest Marathi News)

Notice
Nashik Lok Sabha Election : नाशिक, दिंडोरीत ‘तोफा’ धडाडणार; पंतप्रधानांची सभा 17 ला?

"एमसीएमसी विभागाची परवानगी न घेताच सोशल मीडियावर प्रचार करणे चुकीचे आहे. यासंदर्भात आम्ही संबंधित उमेदवारांना नोटीस बजावली असून, त्यांचा खुलासा प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल." - जलज शर्मा, जिल्हाधिकारी

"सोशल मीडियावरील प्रचार थांबविण्याचे आदेश दिले आहेत. संबंधित उमेदवाराने रीतसर परवानगी घ्यावी. परवानगीनंतरच त्यांना सोशल मीडियावर प्रचार करता येईल. यानंतरही त्यांनी व्हिडिओ हटविले नाही तर उमेदवाराच्या माध्यम प्रतिनिधीवर कठोर कारवाई करण्यात येईल." - बाबासाहेब पारधे, निवडणूक निर्णय अधिकारी (दिंडोरी)

Notice
Nashik Lok Sabha Election : नाशिक, दिंडोरीत ‘तोफा’ धडाडणार; पंतप्रधानांची सभा 17 ला?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com